Home | Sports | Other Sports | Father's suggestion that football is cheaper than the cricket kit thats way I choose Football 

क्रिकेट किटपेक्षा फुटबाॅल स्वस्त असल्याने निवडला वडिलांच्या सांगण्यानुसार खेळ

दिव्य मराठी | Update - Jan 12, 2019, 08:21 AM IST

६७ आंतरराष्ट्रीय गोल करणारा सुनील क्षेत्री जगात दुसऱ्या क्रमांकावर पाेहाेचला. 

 • Father's suggestion that football is cheaper than the cricket kit thats way I choose Football 

  स्पोर्ट्स डेस्क- सुनील क्षेत्रीचे वडील लष्करात अभियांत्रिकी विभागात हाेते. लष्कराच्या टीमकडून ते फुटबाॅलही खेळत. वडिलांचा जन्म नेपाळ देशात झाला. अाई सुशीला व जुळी बहिणही फुटबाॅल खेळत हाेत्या. घरी जेवणाच्या टेबलवर फुटबाॅलचीच चर्चा असायची. मात्र बालपणापासूनच सुनीलचा ओढा क्रिकेटकडे हाेता. लाखाे भारतीयांप्रमाणे सुनीलही सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानायचा. त्याने घरी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा वडिलांना महागडी क्रिकेटची किट खरेदी करणे शक्य नव्हते. त्यामुळे सुनीलने फुटबाॅलसाेबत मैत्री केली आणि खेळणे सुरू केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडिल नेहमी नेहमी नवीन फुटबाॅल बूट खरेदी करुन देऊ शकत नव्हते. त्यामुळे सुनील जुनेच बुट शिऊन वापरायचा. एकदा वडिलांच्या खिशातून पैसे चाेरताना त्याला आईने पकडले हाेते, मात्र रागावण्याऐवजी आई रडू लागली. मुलाला चाेरी करण्याची वेळ आल्याने ती सुनीलची माफी मागू लागली. या घटनेने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. त्याने खेळावर जास्त लक्ष केंद्रीत केले.

  दिल्ली सिटी फुटबॉल क्लबकडून डुरंड कपमध्ये खेळताना काेलकाताच्या माेहन बागान अॅथेलिटिक क्लबची नजर सुनीलवर पडली. २००२ मध्ये माेहन बागान क्लबकडून सुनीलने आपल्या करिअरची सुरुवात केली. २००५ मध्ये पाकिस्तानविराेधात त्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. २००९ मध्ये इंग्लंड फुटबाॅल क्लब क्वीन्स पार्क रेंजर्न्सनने त्याच्याशी तीन वर्षांचा करार केला. मात्र भारतीय फुटबाॅल संघ फिफा रॅकिंगमध्ये टाॅप ७० मध्ये नव्हती. त्यामुळे सुनीलला व्हिसा मिळाला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आज ६७ गाेल नावावर असणारा सुनील जगातील दुसरा खेळाडू आहे. पाेर्तुगालचा क्रिस्टियानाे राेनाल्डाे ८५ गाेलसह पहिल्या स्थानी आहे. तर अर्जेंटिनाचा लियाेनेल मेस्सी ६५ गाेलसह तिसऱ्या स्थानी आहे.

  सुनीलने एका मुलाखतीत सांगितले, जर माेहन बागान क्लबमध्ये निवड झाली नसती तर आज मी लष्करात असताे. तरुणांमध्ये खेळाप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुनीलने 'गेम प्लान' नावाने अॅप सुरू केले आहे.

  सुनील क्षेत्री, फुटबॉलपटू

  जन्म- ३ ऑगस्ट १९८४ (सिकंदराबाद)
  पुरस्कार - अर्जुन पुरस्कार
  पत्नी- सोनम भट्टाचार्य
  टीम - बंगळुरू फुटबॉल क्लब

Trending