आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनस्क्रीन पिता आमिर खानसोबत अफेयरच्या चर्चांवर 'दंगल' गर्ल फातिमा सना शेखने सोडले मौन, म्हणाली - 'मला विचारा, मी उत्तर देते' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : फिल्म 'दंगल' मध्ये रेसलर गीता फोगाटचा रोल केलेली फातिमा सना शेखने आपल्या ऑनस्क्रीन पिता 53 वर्षांच्या आमिर खानसोबत होत असलेल्या अफेयरच्या अफवांवर अखेर मौन सोडले आहे. एका इंटरव्यूदरम्यान ती म्हणाली, "आधी माझ्यावर या गोष्टींचा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. मला वाईट वाटायचे. कारण एवढ्या मोत्थ्य लेव्हलवर मी सर्व गोष्टींचा कधी सामना केला नाही. अनोळखी लोक, ज्यांना मी कधी भेटलेही नाही, ते माझ्याबद्दल हे सर्व लिहीत आहेत. त्यांना हेही नाही माहित की, यामध्ये काय आणि किती सत्य आहे. मला विचारा, मी उत्तरे देते". 

 

मी या सर्वांमुळे खूप परेशान झाले आहे...
- 27 वर्षांच्या फातिमाने पुढे सांगितले, "मी यामुळे परेशान होते आहे, कारण मला लोकनाकडून अशा चुकीच्या गोष्टींची अपेक्षा नाहीये. जर मी खरोखरीच हरामी आहे तर लोकांनी त्यातील सत्य जाणून घेतले पाहिजे. पण जर असे नाहीये तर मला वाटते की, लोकांनी मला माणुसकीच्या नजरेने पाहायला हवे. मात्र, मी या सर्व गोष्टींना आता इग्नोर करायला शिकले आहे. पण तरीही काही दिवस असे असतात, जेव्हा मला या सर्वांचा होतो."

 

डिसेंबरमध्येही फातिमाने केले होते अफेयरच्या बातम्यांवर रिअॅक्ट... 
- मागच्यावर्षी डिसेंबरमध्येही एका इंटरव्यूदरम्यान फातिमाला आमिर खानसोबतच्या अफेयरच्या बातम्यांवर रिअॅक्शन मागितली होती. तेव्हा ती म्हणाली होती, "जर तुमच्यावर कुणी एखादा आरोप केला तर तुमची पहिली रिअक्शन काय असते, 'ऐका...तुम्हाला काय वाटते की, असे काही आहे ?' जे तुम्ही अग्रेसिव व्यक्ती असाल तर तुम्ही अटॅक कराल. पण जर तुम्ही विनम्र आहे तर तुम्ही याबद्दल बोलाल". 

 

का जोडले गेले आमिरसोबत फातिमाचे नाव... 
- फातिमाने 'दंगल' मध्ये महावीर फोगाट (आमिर खान) च्या मुलीचा गीता फोगाटचा रोल केला होता. यांनतर ती आमिर खानसोबत त्याच्या प्रोडक्शनमध्ये   बनलेली फिल्म 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' मध्ये दिसली होती. आमिरदेखील यामध्ये लीड अक्टर होता. अशातच अशी बातमी आली होती की, आमिर फातिमाला घेऊन एक फिल्म प्लॅन करत आहे, ज्यामध्ये तो स्वतः छोटासा, पण महत्वपूर्ण रोल करणार आहे. चर्चाबा अशीही होती की, दोघांचा फिल्ममध्ये रोमँटिक अँगल पाहायला मिळणार आहे आणि ती मे जून पर्यंत फ्लोरवर येऊन जाईल. एकानंतर एक फिल्म सोबत केल्यामुळे फातिमा आणि आमिर यांच्या अफेयरचा अंदाज रिपोर्ट्समध्ये लावला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...