आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चरबीयुक्त पदार्थाने स्थूलपणा येत नाही, जाणून घ्या सत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फॅट किंवा वसा असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने स्थूलपणा येतो किंवा हृदयविकाराचा धोका निर्माण होतो, असे म्हटले जाते. वसायुक्त पदार्थ म्हणजे तेल, तूप किंवा तेलकट पदार्थ असे म्हटले जाते. पण यात फार तथ्य नाही. कॅनडातील ओडियो विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार, जेवणात संतुलित प्रमाणात चरबीयुक्त अन्न सेवन केल्यास स्थूलपणा वाढत नाही. पण कर्बोदकांमुळे शरीराची जाडी वाढू शकते. 


तूप, लोणी, वनस्पती तूप, नारळ, मांस, अंड्याचा पिवळा भाग, चिकन, पनीर, पूर्ण मलईयुक्त दूध, फास्ट फूड यांमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतात. अमेरिकेत जास्त वजन असलेल्या मुलांवर तेथील तज्ज्ञ डॉ. रॉबर्ट लस्टिग हे उपचार करतात. त्यांनी नुकतेच एक सर्वेक्षण केले. ते म्हणतात, लोक स्थूलपणा कमी करण्यासाठी चरबीयुक्त पदार्थ टाळतात. पण स्थूलपणा वाढवणारी साखर भरपूर खातात. 'फॅट चान्स : दि बिटर ट्रुथ अबाउट शुगर' या पुस्तकात त्यांनी याविषयी सविस्तर लिहिले आहे. अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटॅटिक्स येथील जुडी कॅपलन म्हणतात, सॅच्युरेटेड फॅटचे संतुलित प्रमाणात सेवन केल्यास डोळे, मेंदू आणि हृदय निरोगी राहते. यामुळे हार्मोन्सदेखील संतुलित राहतात. 


असंतृप्त वसा म्हणजे अन्सॅच्युरेटेड फॅटला गुड फॅट असेही म्हणतात. यात जैतून- शेंगदाणा तेल, सुका मेवा, जवसाच्या बियांचा समावेश होतो. कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यात हे उपयुक्त ठरतात. तसेच इन्सुलिनचे प्रमाण आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठीही हे प्रभावी ठरतात. 
स्रोत: rd.com, onlymyhealth.com 

बातम्या आणखी आहेत...