आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एफसीआयचे भांडवल 10,000 काेटी रुपये; धान्याचे पॅकिंग ज्यूट गोणीतच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थिक प्रकरणांच्या मंत्रिमंडळ समितीचा निर्णय, एफसीआयचे कर्ज घटेल
  • एफसीआयच्या उधारीत येईल घट, शेतकऱ्यांकडील खरेदीसाठी एफसीआयकडे असेल जास्त रक्कम

​​​​​​नवी दिल्ली : मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत भारतीय अन्न महामंडळा(एफसीआय)चे अधिकृत भांडवल ३५०० काेटी रुपयांवरून वाढून १०,००० काेटी रुपये केले आहे. यासाेबत ज्यूट उद्याेगास दिलासा देत धान्यांच्या पॅकिंगसाठी १०० टक्के ज्यूटची गाेणीत करणे बंधनकारक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या आर्थिक प्रकरणांच्या मंत्रिमंडळ समिती(सीसीईए)ने हा निर्णय घेतला. अधिकृत भांडवलातील वाढीमुळे एफसीआयच्या कर्जात घट येण्यासाेबत व्याजावरील खर्चातही कपात येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एफसीआय शेतकऱ्यांकडून हमी भावावर(एमएसपी)धान्य खरेदीची प्रमुख संस्था आहे. संस्था शेतकऱ्यांकडून गहू आणि तांदळाची माेठ्या प्रमाणात खरेदी करते.

एफसीआय हमी भावाने धान्य खरेदी करते

पीडीएससाठीही धान्याचे वाटप करते एफसीआय

एफसीआय अन्नाचा राखीव साठा बनवण्यासाेबत सार्वजनिक वितरण प्रणाली व अन्य कल्याणकारी याेजनांमध्ये अन्नाचे वाटपही करते. भारतीय अन्न महामंडळाच्या संचालनासाठी धान्य भांडाराची देखरेख आवश्यक असते. याची आर्थिक गरज केंद्राद्वारे इक्विटी वा दीर्घकालीन कर्जाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. सरकार एफसीआयला धान्य साठ्याच्या देखरेखीसाठी इक्विटी देत आहे.

एफसीआयकडे 604.82 लाख टन धान्य साठा

भारतीय अन्न महामंडळाकडे १ नाेव्हेंबरपर्यंत धान्याचा ६०४.८२ लाख टन साठा हाेता. यामध्ये ३७३.७७ लाख टन गहू आणि २३१.०५ लाख टन तांदूळ आहे. चालू खरीप विपणन हंगाम २०१९-२० मध्ये अन्न महामंडळ, राज्य सरकारच्या संस्थांसाेबत शेतकऱ्यांच्या धान्याचा हमी भाव १८१५ ते १८३५ रु. प्रति क्विंटलच्या दराने खरेदी करते. एफसीआयची इक्विटी भांडवल ३,५०० काेटी रु. आहे.

धान्यांचे १०० टक्के पॅकिंग ज्यूटच्या पाेत्यात

सीसीईएने ज्यूट उद्याेगाला दिलासा देण्यासाठी धान्याचे १०० टक्के पॅकिंग ज्यूटच्या पाेत्यात करणे बंधनकारक केले आहे. याशिवाय साखरेचे २० टक्के पॅकिंगही ज्यूटच्या गाेणीत करणे बंधनकारक केले आहे. सूत्रांनुसार, ज्यूट उद्याेगात जवळपास ३.७ लाख लाेक काम करतात. ज्यूट उद्याेग मुख्यत: सरकारी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यांच्याकडून धान्याच्या पॅकिंगसाठी दरवर्षी ६,५०० काेटी रुपयांहून जास्त किमतीच्या ज्यूटच्या गाेण्या खरेदी केल्या जातात.

 

बातम्या आणखी आहेत...