आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्प विकास दराच्या काळातील भय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेतन भगत


एका दिग्गज उद्याेगपतीने केलेल्या टिप्पणीची केंद्र सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी दखल घेत कुणालाही भयभीत हाेण्याची गरज नाही, या आश्वासनाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, काॅर्पाेरेट भारताने आजवर सार्वजनिकरीत्या सरकारवर टीकास्त्र साेडले नव्हते. सरकार काेणत्याही पक्षाचे, किंवा कुणाच्याही नेतृत्वाखालील असाे, भारतीय प्रमाेटर आपली जागा ओळखून आहेत. जेफ बेजाे एका वृत्तपत्राचे मालक आहेत, ते कधी-कधी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांवर टीका करू शकतात. अॅपलचे सीईओ अमेरिकी धाेरणांवर नाराजी व्यक्त करू शकतात. परंतु भारतीय अब्जाधीशांना ते शक्य नाही. कारण त्यांच्यासमाेर हजाराे तरुण हात जाेडून उभे असतात. एका वरिष्ठ आयएएस किंवा मंत्र्यासमाेर आपले अब्जाधीश हात जाेडून उभे असतात. आपण सारे जण आपली जागा ओळखून असताे, क्षमता जाणून असताे. खरे की नाही?

भारतात धनवानांना माेठी प्रतिष्ठा मिळते, राजकीय नेत्यांशी ताळमेळ जुळून राहावा यासाठी ते प्रयत्नरत असतात. एका फाेनवर त्यांचा उद्याेग लयास जाऊ शकताे, काेणत्याही नियम किंवा कायदेशीर तरतुदीत अडकवून छळ केला जाऊ शकताे. भयगंड बाळगून राहण्यापेक्षा हात जाेडून राहणे अधिक व्यवहार्य ठरते. नेत्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावे आणि आपण व्यवसाय करीत राहावा. एखादा राजकीय मुद्दा बनवणे किंवा सरकारवर तुटून पडणे हे त्याच ट्विटर याेद्ध्यांसाठी ठीक आहे, ज्यांना काेणत्या मार्केटमधील भांडवल गमावले जाण्याची भीती नसते.

काही लाेक विचारतात की, एवढी काय भीती वाटते? याचे थेट उत्तर असे आहे, जेवढे मजबूत सरकार सत्तेत असेल, तेवढी भीती अधिक असणार. यावरून लक्षात येते की, सत्तारूढ असूनदेखील यूपीए-२ वर अतिशय वाईट पद्धतीने टीका का व्हायची? लाेकांचा मूड बदलला हाेता. निवडणुका बऱ्याच लांब असतानाही यूपीए-२ लाेकांच्या नजरेत पराभूत झालेला हाेता. काॅर्पाेरेट भारत कधीही सरकारसाठी फीडबॅकचा स्रोत नव्हता. कारण त्यांचे मुद्दे केवळ या क्षेत्रापुरते मर्यादित असतात. म्हणूनच त्यांना अधिक भीती वाटत असते. आपल्याकडील प्रशासकीय व्यवस्था आणि नेते खासगी क्षेत्राला स्वतंत्रपणे काम करू देत नाहीत. अखेर एक अब्जाधीश आपल्यासमाेर हात जाेडून उभा आहे, हे त्यांच्यासाठी सुखावह असतेच, नाही का?

ज्या अडचणींशी आपण सारे लढा देत आहाेत, त्याचा सामना काॅर्पाेरेट भारत करीत नाही का? सरकारला याेग्य फीडबॅक काेण देत असते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकार हे विचारात घेत असते? जेव्हा राजकीय पातळीवर काही चांगलेे करीत असाल तेव्हा आत्मसंतुष्ट हाेणे स्वाभाविक आहे. दुसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारला संसदेत तगडे बहुमत मिळाले आहे. जेव्हा तुम्ही राजकीय विजय संपादित करीत असता तेव्हा टीकाकार उभे हाेत असतात का? जीडीपी वाढीची काळजी का करावी, आमच्या मतदारांना तर काही खंत नसते? स्वत:चे आकलन कशा पद्धतीने करायला आवडते त्यावर या प्रश्नांची उत्तरे अवलंबून असतात. केवळ निवडणूक जिंकणे एकमेव मापदंड असेल तर भाजप आपल्या जागी याेग्य ठरते. राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक निकाल यासंदर्भात पुरेसा पुरावा ठरावा. अन्य राज्यांमधील निवडणुकीत असे निकाल हाती आले नाहीत, हे खरेच. तरीही भाजप आज सर्वात माेठा पक्ष आहे. आता हीच बाब जितकी गुंतागुंतीची बनवता येईल तितकी बनवता येते. एकंदरीत एक चांगला भारतीय नेता ताेच ठरताे, जाे १. प्रत्येकाला स्वत: साेबत घेताे आणि २. उच्चतम जीडीपी विकास दर देऊ शकताे.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात सर्वांना साेबत घेऊन चालणे अतिशय महत्त्वाचे ठरते. जेथे लाेकांमध्ये प्रचंड मतभेद असतील तेथे विवादाची कारणे शाेधणे अतिशय साेपे जाते. म्हणजे जेव्हा भाजपचे सरकार सत्तेवर आले त्यानंतर भारत अधिक एकजूट झाला का? की आम्ही अधिक विभक्त हाेत गेलाे आहाेत? याविषयीचा निर्णय मी सरकारवरच साेडताे. आता दुसरा अजेंडा म्हणजे एक शानदार जीडीपी विकास दर आमची गरज आहे. एका मजबूत जीडीपी विकास दराचा अर्थ अधिक राेजगार संधी, अधिक गुंतवणूक, अधिक पायाभूत विकास, जनतेच्या हाती अधिक पैसा, लाेककल्याणकारी याेजनांसाठी अधिक निधीची उपलब्धता, जगभरात सन्मान आणि एकुणात अधिक ताकद. अलीकडच्या तिमाहीतील ४.५% जीडीपी विकास दर अतिशय कमजाेर म्हणावा असाच. उल्लेखनीय म्हणजे घाेटाळे आणि आघाडीतील घटक पक्षांच्या दबावाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात जीडीपी विकास दर ८% च्या जवळपास हाेता. आज साऱ्या बाबी अनुकूल असतानाही १०% विकास दराचे उद्दिष्ट आपण का गाठू शकत नाही? राजकीय प्रदर्शन भलेही प्रशंसनीय ठरत असले तरी जनतेला यापेक्षाही अधिक अपेक्षा असतात.

कशा पद्धतीने सत्ताधीश हाेऊन राहायचे हे दाखवून देण्याचा काळ नव्हे, तर आम्ही कशासाठी सत्तेेत आलाे आहाेत या मूलभूत प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यायला हवे.

चेतन भगत इंग्रजी लेखक chetan.bhagat@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...