आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fear Once In A High Place; Instead Of Helping Out Hundreds Of Tall Buildings, Sir

एकेकाळी उंच जागेला घाबरायचे; आता मदत न घेता शेकडो फूट उंच इमारत करतात सर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘फ्रेंच स्पायडरमॅन’ एखाद्या नायकाप्रमाणे शेकडो फूट उंच इमारत सर करतो. त्याचा हा कारनामा बंदिस्त करण्यासाठी अनेक कॅमेरे व मोबाइल सरसावलेले असतात. इतकेच काय, अटक करण्यापूर्वी पोलिसही त्याच्यासोबत छायाचित्रे काढून घेतात. ही स्पायडरमॅन पठडीच्या चित्रपटातील नव्हे, तर खरे स्पायडरमॅन अर्थात अॅलन रॉबर्टची कहाणी आहे. नुकतेच अॅलननी लंडनच्या हेरोन टॉवरच्या शिखरावर चढाई केली. मात्र, त्यांना पाहण्यास तिथे लोकांची खूप गर्दी झाली. त्यामुळे अव्यवस्था निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी त्यांना अटक केली.

 

मूळचे फ्रान्सचे असलेेले अॅलन एखाद्या इमारतीवर चढतात तेव्हा सोबतच्या बॅगेत चॉक पावडर, पाण्याची बाटली व पासपोर्ट ठेवतात. भिंत किंवा काचेवर पकड मजबूत राहावी यासाठी चॉक पावडर, तर पोलिसांनी पकडू नये म्हणून पासपोर्ट असतो. वयाच्या बाराव्या वर्षी एकदा अॅलन बाहेरून घरी परतले. मात्र, त्यांच्याकडे घराची किल्ली नव्हती. प्रतीक्षा करायचे सोडून गच्चीतून घरात प्रवेश मिळवण्याच्या उद्देशाने अॅलननी कोणत्याही मदतीविना सातमजली इमारत क्षणार्धात सर केली.

 

आज वयाच्या ५६ व्या वर्षी या स्पायडरमॅनने जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेली बुर्ज खलिफासह (२,७१७ फूट) १०० पेक्षा जास्त इमारती कोणत्याही मदतीविना सर केल्या आहेत. २०१२ मध्ये कतारमधील ९८० फुटी अॅस्पायर टॉवर केवळ १ तास ३३ मिनिटे आणि ३३ सेकंदांत चढून त्यांनी जागतिक विक्रम नोंदवला.  अॅलननी तिसाव्या वर्षी क्लायंबिंगला सुरुवात केली. आधी डोंगर चढायचे. एके दिवशी एका लघुपट निर्मात्याने त्यांना एक गगनचुंबी इमारत (सुमारे ५०० फुटांपेक्षा उंच) सर करण्यास प्रेरित केले. त्यांनी नंतर शिकागोतील १४५० फूट उंच सिअर्स टॉवर गाठले. ते उंची इमारतीचे काच, खिडक्यांची तावदाने, लोखंडी गज व त्याखालील जागेच्या माध्यमातून गाठतात.

 

बालपणी त्यांना उंच जागेची भीती वाटायची. हीच भीती घालवण्यासाठी शालेय जीवनात सराव सुरू केला. ‘द ग्रीविंग स्नो’ हा हॉलीवूडपट पाहून उंच इमारती सर करणे हा छंदच बनवला. ते आजवर पाच वेळा उंच जागेवरून खाली पडलेत. १९८२ मध्ये  ४९ फूट उंचीवरून पडल्याने ५ दिवस कोमात होते.  

 

 

बातम्या आणखी आहेत...