आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिंगापूर- चीनमध्ये पसरलेल्या महाभयंकर कोरोना व्हयरसच्या भीतीमुळे सिंगापूरमध्ये एका कपलने लाइव्ह स्ट्रीमिंग करत लग्न केल्याचा प्रकार घडला आहे. हे कपल काही दिवसांपूर्वी चीनच्या वूहान शहरात गेले होते, यामुळे त्यांनाही कोरोना झाल्याचा इतरांना संशय होता. त्यामुळे कपलने लग्न लाइव्ह स्ट्रीमींगमधून लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नस्थळावर सर्व पाहुणे जमा झाले आणि कपलने हॉटेलच्या रुममधून लाइव्ह स्ट्रीमिंग करत लग्नाच्या सर्व विधी पार पाडल्या. हे लग्न 2 फेब्रुवारीला झाले, पण लग्नाचे फोटो आता व्हायरल होत आहेत. या अनोख्या पद्धतीने मिसेज अँड मिस्टर यू नावाचे हे कपल लग्नबंधनात अडकले. लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान दोघांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले- "आयुष्यातील हा सुखाचा क्षण तुमच्यासोबत न घालवण्यासाठी तुमची माफी मागतो, पण तुम्ही येथे आल्याबद्दल खूप आनंदी आहे." कपलच्या एका मित्राने सांगितले की, काही दिवसांपूर्वी हे कपल मुलाच्या आईला भेटण्यासाठी वुहानला गेलो होते. त्यामुळेच, काळजीपोटी त्यांनी लोकांमध्ये न जाता लांब राहुन लग्न करण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरसचे 28 रुग्ण सिंगापूरमध्ये आतापर्यंत 28 रुग्ण कोरोना व्हायरसने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे चीनमध्ये आतापर्यंत 562 जणांचा मृत्यू झालाय तर 27 हजारांपेक्षा जास्त लोकांना या रोगांची लागण झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.