Gadget / Smart Umbrella : 9 फूट उंच छत्रीत ब्लूटूथ स्पीकर, LED लाइट आणि फोन चार्जिंग पोर्टची सुविधा, सौरऊर्जेवर करते काम

या छत्रीच्या मदतीने आपला पावसाळा करा स्मरणीय 

दिव्य मराठी वेब

Jun 23,2019 02:43:00 PM IST

गॅझेट डेस्क - बाजारात विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत. पण मुसळधार पावसात ह्या छत्र्या निकामी पडतात. अशात यावेळी मात्र तुम्ही पावसाळ्यात आणखी मजेशीर करू शकता. यासाठी तुम्हाला सोलर ब्लूटूथ छत्रीची आवश्यकता भासेल. ही छत्री इतर साधारण छत्रीच्या तुलनेत बरेच मोठी असते. सोबतच यात अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आलेले आहेत. सियरा, पॅटीओ, बॅकयार्ड यांसारख्या कंपन्याच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला सियरा सोलर ब्लूटूथ छत्रीची माहिती देत आहोत.

छत्रीचे फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.....

9 फुट उंच छत्री या छत्रीची उंची 9 फूट आहे. तुम्हाला कुठे पिकनिकसाठी जायचे असले तर ही छत्री तुम्हाला फायदेशीर ठरेल. सोबतच वेगवेगळ्या दिशेने तुम्ही या छत्रीला वळवू शकता. हवेच्या अंदाजानुसार ही छत्री सेट करता येते. तसेच ही छत्री उन्हापासून तुमचे पूर्णपणे संरक्षण करते. साधारण छत्रीत एक किंवा दोन जण सामावतात पण या छत्रीत 5 ते 6 लोक या छत्रीत सहज सामावतात24 LED लाइट्स छत्रीत देण्यात आलेल्या 24 LED लाइट्समुळे छत्री आणखीनच खास बनते. छत्रीच्या चोहीबाजूने हे लाइट्स लावण्यात आलेले आहेत. तुम्ही आउटडोर पिकनिकला गेल्यास या लाइट्सचा उपयोग करू शकतात. ही छत्री घराच्या छतावर लावून तुम्ही आपल्या परिवारासोबत मिडियम लाइट डिनरचा आनंद देखील घेऊ शकता. या सर्व लाइट्ससाठी एकच बटन देण्यात आले आहे.मास्टर ऑन/ऑफ छत्रीत मास्टर ऑन/ऑफ चे बटन देण्यात आले आहे. या एका बटनावर छत्रीचे सर्व फीचर्स चालू बंद करू शकतात. या बटनाद्वारे LED लाइट्ससोबत ब्लूटूथ स्पीकर, व्हॉल्यूम कंट्रोल, USB चार्जिंग यांसारखे फंग्शन्स ऑपरेट करता येतात.वाटरप्रूफ केसिंग ही छत्री वाटरप्रूफ केसिंगसोबत येते. यामुळे तुम्ही पावसात या छत्रीखाली उभे राहून पार्टीचा आनंद घेऊ शकता. ही छत्री मोठ्या जागेला सहज व्यापते. अशात तुम्ही छत्रीच्या खाली एकाचवेळी अनेक जण सहज सामावू शकतात.ब्लूटूथ स्पीकर सिस्टम या छत्रीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात ब्लूटूथ स्पीकर सिस्टम देण्यात आले आहे. यामुळे तुम्ही आपल्या ब्लूटूथ फोनच्या मदतीने गाण्याचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही तर आवाज कमी-जास्त करण्यासाठी यामध्ये बटन देखील देण्यात आले आहे.USB चार्जिंग पोर्ट या हायटेक छत्रीत USB चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही USB डिवाइसला चार्ज करू शकता. हे एका पावरबँकप्रमाणे काम करते. ऐनवेळी तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर ही छत्री कामी येते.3.5 वॉट सोलर प्लेट या छत्रीत 3.5 वॅटची सोलर प्लेट देण्यात आली आहे. यामुळे विज खर्च न करता ही छत्री तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी देते. याची किंमत 8 ते 10 हजार रुपयांच्या जवळपास आहे.

9 फुट उंच छत्री या छत्रीची उंची 9 फूट आहे. तुम्हाला कुठे पिकनिकसाठी जायचे असले तर ही छत्री तुम्हाला फायदेशीर ठरेल. सोबतच वेगवेगळ्या दिशेने तुम्ही या छत्रीला वळवू शकता. हवेच्या अंदाजानुसार ही छत्री सेट करता येते. तसेच ही छत्री उन्हापासून तुमचे पूर्णपणे संरक्षण करते. साधारण छत्रीत एक किंवा दोन जण सामावतात पण या छत्रीत 5 ते 6 लोक या छत्रीत सहज सामावतात

24 LED लाइट्स छत्रीत देण्यात आलेल्या 24 LED लाइट्समुळे छत्री आणखीनच खास बनते. छत्रीच्या चोहीबाजूने हे लाइट्स लावण्यात आलेले आहेत. तुम्ही आउटडोर पिकनिकला गेल्यास या लाइट्सचा उपयोग करू शकतात. ही छत्री घराच्या छतावर लावून तुम्ही आपल्या परिवारासोबत मिडियम लाइट डिनरचा आनंद देखील घेऊ शकता. या सर्व लाइट्ससाठी एकच बटन देण्यात आले आहे.

मास्टर ऑन/ऑफ छत्रीत मास्टर ऑन/ऑफ चे बटन देण्यात आले आहे. या एका बटनावर छत्रीचे सर्व फीचर्स चालू बंद करू शकतात. या बटनाद्वारे LED लाइट्ससोबत ब्लूटूथ स्पीकर, व्हॉल्यूम कंट्रोल, USB चार्जिंग यांसारखे फंग्शन्स ऑपरेट करता येतात.

वाटरप्रूफ केसिंग ही छत्री वाटरप्रूफ केसिंगसोबत येते. यामुळे तुम्ही पावसात या छत्रीखाली उभे राहून पार्टीचा आनंद घेऊ शकता. ही छत्री मोठ्या जागेला सहज व्यापते. अशात तुम्ही छत्रीच्या खाली एकाचवेळी अनेक जण सहज सामावू शकतात.

ब्लूटूथ स्पीकर सिस्टम या छत्रीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात ब्लूटूथ स्पीकर सिस्टम देण्यात आले आहे. यामुळे तुम्ही आपल्या ब्लूटूथ फोनच्या मदतीने गाण्याचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही तर आवाज कमी-जास्त करण्यासाठी यामध्ये बटन देखील देण्यात आले आहे.

USB चार्जिंग पोर्ट या हायटेक छत्रीत USB चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही USB डिवाइसला चार्ज करू शकता. हे एका पावरबँकप्रमाणे काम करते. ऐनवेळी तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर ही छत्री कामी येते.

3.5 वॉट सोलर प्लेट या छत्रीत 3.5 वॅटची सोलर प्लेट देण्यात आली आहे. यामुळे विज खर्च न करता ही छत्री तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी देते. याची किंमत 8 ते 10 हजार रुपयांच्या जवळपास आहे.
X
COMMENT