आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगीपणाचे हक्क भंग; फेसबुकला दंड आकारणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) सोशल मीडिया नेटवर्किंग साइट फेसबुकला अब्जावधी डॉलरचा दंड आकारण्याच्या तयारीत आहे. युजरच्या डेटाचे संरक्षण करण्याचे वचन भंग केल्याचा आरोप फेसबुकवर असून त्याचा तपास सुरू आहे. फेसबुकला डेटा सुरक्षा आणि तो शेअर करण्याची प्रणाली मजबूत करण्याचेही आदेश दिले जाऊ शकतात. एफटीसी आणि कंपनीदरम्यान चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. 


२०११ मध्ये डेटा संरक्षणाचे दिलेले वचन फेसबुकने पाळले नाही या दिशेने हा तपास सुरू आहे. न्यूयॉर्क टाइम्सने, फेसबुकमार्फत ८ कोटी ७० लाख युजर्सचा डेटा अॅनालिसिस झाल्याची बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये फेसबुकविरोधात तपास सुरू झाला. एफटीसीचे अध्यक्ष जोसेफ सिमेन्स आणि चार इतर आयुक्तांकडून हा तपास लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या तपासाचे परिणाम लवकरच दिसतील. युजर्सचा डेटा गोळा करून अमर्याद पैसा आणि ताकद कमावणाऱ्या दिग्गज कंपन्यांवर सरकारचा अंकुशही बसू शकतो. ओबामा सरकारमधील एफटीसीचे प्रमुख डेव्हिड व्लाडेक यांच्या मते, 'एफटीसीचा निर्णय हा फेसबुक, टेक इंडस्ट्री आणि ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचा असेल.' 


निवडणुकीत स्पर्धकांना नुकसान पोहोचवण्यासाठी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यामुळे अनेक तंत्रज्ञान कंपन्यांना विविध दोषारोपांना सामोरे जावे लागत आहे. तंत्रज्ञान कंपन्यांकडून वापरल्या जाणाऱ्या डेटा कलेक्शनच्या पद्धतींवर लगाम लावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे खासदार सतत एफटीसीवर दबाव आणत आहेत. एजन्सीने आतापर्यंत सर्वात मोठा दंड (दोन कोटी २० लाख डॉलर) गुगलवर लावला आहे. अवैध मार्गाने माहिती पुरवल्याचा आरोप गुगलवर होता. त्या वर्षी गुगलने ५० अब्ज डॉलर कमाई केली होती. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत दावेदार असलेले डेमोक्रॅट सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी अॅमेझॉन, गुगल, अॅपल आणि फेसबुकसह अनेक बड्या तंत्रज्ञान कंपन्यांवर अंकुश लावण्याची योजना मांडली आहे. या कंपन्यांच्या उत्पन्नानुसार नुकसान भरपाईची तरतूद नाही. पण अध्यक्ष सिमेन्स यांनीही टीकाकारांच्या मताला सहमती दर्शवली आहे. प्रायव्हसीविषयक कायदा अधिक विस्तारावा तसेच विविध कंपन्यांवर सहज दंड लावता यावा, अशी विनंती एफटीसीचे अध्यक्ष सिमेन्स यांनी अमेरिकी काँग्रेसकडे केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...