आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडरेशन वयाची चाेरी राेखण्यासाठी घेणार संशयित खेळाडूंची बाेन टेस्ट, वर्षभरात ओव्हरएजची ३९४ प्रकरणे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि राज्य स्पर्धेदरम्यान वय लपवण्याचा प्रकार करणाऱ्या खेळाडूंना आणि त्याच्या संबंधित संघटनेला चांगलेच महागात पडणार आहे. या प्रकरणावर आता अंकुश ठेवण्यासाठी विविध इव्हेंटच्या फेडरेशनने कंबर कसली आहे. यासाठी पुढाकार घेत फेडरेशनच्या वतीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओव्हरएजची प्रकरणे तपासण्यासाठी फेडरेशनच्या वतीने संबंधित खेळाडूंची बाेन टेस्ट घेण्यात येणार आहे. यातून अशा प्रकारच्या प्रकरणाला आळा घालता येणार आहे, असा विश्वास फेडरेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला. 


गत वर्षभरामध्ये ओव्हरएजच्या प्रकरणात प्रचंड वाढ झाली आहे. देशातील सर्वात लाेकप्रिय असलेल्या वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स, कुस्ती आणि फुटबाॅलसारख्या खेळामध्ये हा प्रकार सर्रास हाेत असल्याचे दिसून आले. या चारही खेळांमध्ये वर्षभरात ३९४ प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. 


ओव्हरएज प्रकरणी गुन्हा दाखल: वय लपवल्याच्या प्रकरणी संघटनांनी एकजूट हाेऊन कडक नियम करण्यासाठी पुुढाकार घेतला.या प्रकरणी यापूर्वी गुन्हाही दाखल करण्यात आला हाेता. जुलै महिन्यात ज्युदाेपटू यश चाैहानने हा प्रकार उघडकीस आणला. त्याचे वडील नवीन चाैहान यांनी हा प्रकार करणाऱ्या अनुजवर गुन्हा दाखल केला हाेता. 


प्रत्येक फेडरेशन आता अशा प्रकरणावर अंकुश ठेवण्यासाठी तयार करत आहे कडक कारवाईचे प्रस्ताव 
1. अॅथलेटिक्स फेडरेशन राज्य संघटनेच्या सचिवावर करेल ६ महिने बंदीची कारवाई 
2. फुटबाॅल फेडरेशनने बेबी लीग सुरू हाेण्यापूर्वीच सर्वांची करून घेतली नाेंदणी 
3. वेटलिफ्टिंग फेडरेशन आता युवांच्या स्पर्धेपूर्वी बायोमेट्रिक नाेंदणी करणार 
4. राष्ट्रीय कुस्ती फेडरेशन राज्य संघटनेवर या प्रकरणी करणार कडक कारवाई 


या प्रकरणावर अंकुशसाठी संघटनांचा पुढाकार 
1. अॅथलेटिक्स: राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान ओव्हरएज प्रकरणी दाेषी असलेल्या खेळाडूंच्या राज्य संघटनेच्या सचिवावर आता सहा महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सुमारीवाला यांनी दिली. 
3. वेटलिफ्टिंग: फेडरेशन आता युवांच्या १३ वर्षांखालील स्पर्धांसाठी बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन सुरु करणार आहे .यामुळे नाव बदलून किंवा वय लपवून खेळण्याचा प्रयत्न काेणताही खेळू शकणार नाही ,अशी आमची याेजना आहे,असे महासंघाचे सचिव सुनील कुमार म्हणाले. 
2. कुस्ती: विविध स्पर्धेदरम्यान वय लपवण्याचा प्रकार समाेर आला तर संबंधित खेळाडू अाणि त्याच्या राज्य संघटनेवर कारवाई करण्याचा अामचा प्रस्ताव तयार आहे, अशी माहिती कुस्ती महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे. 
4. फुटबॉल: महासंघाच्या वतीने यंदापासून बेबी लीगला सुरुवात हाेत आहे. यादरम्यान खेळाडूंच्या नावांची नाेंद हाेईल. त्यामुळे फेडरेशनकडे या सर्व सहभागी खेळाडूंच्या माहितीचा डाटा असेल.त्यामुळे हा प्रकार घडणार नाही, असा विश्वास सहसचिव काैशल दास यांनी व्यक्त केला. 


आता दात व मिश्यावरून वयाचा लागताे अंदाज 
ज्युदाे, वेटलिफ्टिंगसह कुस्ती फेडरेशनची आर्थिक परिस्थिती अद्याप मजबूत नाही. त्यामुळे या खेळाच्या संघटना ह्या ओव्हरएजच्या प्रकरणाच्या चाैकशीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करतात. यामध्ये खेळाडूंच्या वयाचा अंदाज दात आणि मिश्यावरून बांधला जाताे. तसेच खेळाडूंनी केलेल्या तक्रारीवरूनही हे महासंघ चाैकशी करत असतात. यासाठी आता नव्या पद्धतीचा वापर हाेणे गरजेचे आहे. 


बाेन टेस्टमध्ये मणक्याच्या हाडांचा काढतात एक्सरे 
वय लपवण्याचा प्रकार राेखण्यासाठी आता सर्वच संघटनांनी पुढाकार घेतला. यासाठी अत्याधुनिक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळेच हा प्रकार तपासण्यासाठी आता बाेन टेस्ट हाेईल. साईचे मेडिकल अधिकारी चंद्रन म्हणाले की, मणक्याच्या हाडाचा एक्सरे काढण्यात येईल. त्यातूनच हा प्रकार लक्षात येईल, असेही त्यांनी सांगितले. 


अ‌ॅथलेटिक्समध्ये वय लपवण्याचे सर्वाधिक प्रकार 
चार प्रमुख खेळाच्या बाबतीत सखाेल चाैकशी केल्यास याेग्य वय लपवण्याचा सर्वाधिक प्रकार अॅथलेटिक्समध्ये हाेत असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे या खेळात वर्षभरात १७४ प्रकरणाची नाेंद झाली आहे. त्यापाठाेपाठ वेटलिफ्टिंगचा खेळ आहे. यामध्ये ३० ते ४० प्रकरणांची नाेंद झाली. फुटबाॅलमध्ये गत दाेन वर्षात ३०० प्रकरणे चव्हाट्यावर आली. म्हणजेच प्रत्येक वर्षी १५० ची नाेंद झाली आहे. 


उत्तर प्रदेश, हरियाणात सर्वाधिक 
कुस्ती, अॅथलेटिक्स आणि वेटलिफ्टिंगच्या खेळात ओव्हरएजची सर्वाधिक प्रकरणे समाेर आली आहेत. ही सर्वाधिक प्रकरणे आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये नाेंद झाले आहेत. रांचीच्या ज्युनियर नॅशनल अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २११ खेळाडूंनी सहभाग नाेंदवला हाेता. यातील ७४ खेळाडूंच्या ओव्हरएजचा प्रकार समाेर आला हाेता. तसेच हरियाणामध्ये याची सहा प्रकरणे उघडकीस आली आहेत. तसेच मध्य प्रदेशमध्ये २९, रायपूरमध्ये ४२ प्रकरणाची नाेंद झाली. तसेच राजस्थान ६, तेलंगणा व उत्तर प्रदेशात प्रत्येकी ५ ची नाेंद आहे. 

बातम्या आणखी आहेत...