आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATM मधून पैसे काढण्यापासून, लॉकरपर्यंत होणार महाग; सरकारच्या या निर्णयाचा नागरिकांना फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - बँक आपल्या ATM मधून पैसे काढणे, लॉकर व्हिजीट आणि देण्यात येणाऱ्या इतर मोफत सेवा आता मोफत राहणार नाहीत. महसूल विभागाकडून बँकांद्वारे देण्यात येणाऱ्या अशाप्रकारच्या मोफत सुविधांवर 40 हजार कोटी रूपये सर्व्हीस टॅक्स मागितला आहे. असे असूनही बँकांद्वारे या सुविधा मोफत दिल्या जातात. जूनमध्ये अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत महसूल व वित्त सेवा विभागाच्या बैठकीत बँकांनी या सेवांवर कर सवलत देण्याची मागणी केली होती. हिंदू बिझनेस या वृत्तपत्राच्या अहवालानुसार आता हे प्रकरण पंतप्रधान कार्यालयाकडे गेले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी बँका आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आठवड्यात या समस्येचे निराकरण केले जाऊ शकते.


महसूल विभागाने बँकांना दिली नोटिस
> महसूल विभागाने यावर्षी एप्रिल महिन्यात बँकांना सेवांवरील सर्व्हिस टॅक्स आणि त्यावर होणारे व्याज जमा करण्याची नोटीस दिली आहे. हा सर्व्हिस टॅक्स बँक विनामूल्य देत असलेल्या सुविधांवर लागू करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून मुक्त सेवांवरील कर जमा न केल्यामुळे बँकांवर 12 टक्के सेवा करासोबत त्यावर 18 टक्के व्याज आणि 100 टक्के दंड आकारून नोटीस पाठवली आहे. नोटिस मिळाल्यानंतर बँकांनी सरकारला नोटीस मागे घेण्यास सांगितले आहे.


या मोफत सुविधांवर होऊ शकतो परिणाम
> बँकांना जर 40 हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरावा लागला तर येणाऱ्या काळात बँक ATM मधून पैसे काढणे, चेकबुक सुविधा, पैसे भरणा, लॉकर व्हिजिट, महिन्याला खात्याची देखभाल आणि जन धन योजना सारख्या सामान्य नागरिकांच्या हिताच्या सुविधांवर शुल्क आकारले जाऊ शकते. सध्या या सेवांवर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. जरी आकारले तरी ते नाममात्र आकारण्यात येते.


बँकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा
> बँकांना अशी अपेक्षा आहे की, सामान्य व्यक्तींना यापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकार या सर्व्हिस टॅक्सच्या नोटिस बाबत काही मदत करू शकेल. कारण बँकांच्या सेवांवर आणि ग्राहकांच्या खात्यातील किमान शिल्लक देखभाल सेवांवर GST लागू करण्यात येणार नसल्याचे सरकारने जूनमध्ये स्पष्ट केले होते. 

बातम्या आणखी आहेत...