Home | National | Madhya Pradesh | Feeling of responsibility and love brother for sister happiness in bardwani Indore

भाऊ-बहिणीचे अनोखे नाते, 8 वर्षांच्या भावाच्या छातीतून निघत होते रक्त, पण घरी येईपर्यंत सोडली नाही बहिणीची साथ, मुलीचे बोलणे ऐकुण सगले झाले स्तब्ध...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 03:37 PM IST

लहान बहिणीला खुश करण्यासाठी आयुष्य लावले पणाला.

 • बडवानी(मध्यप्रदेश)- जिल्ह्यात भाऊ-बहिणीचे अनोखे प्रेम पाहायला मिळाले. बुधवारी दुपारी 2 वाजता बडडवानी जिल्ह्यीतल बुदी गावातील लहान बहीण सीमाने बोर खाण्याचा हट्ट केला. एकुलत्या एक बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी 8 वर्षीय सुरज बोराच्या झाडावर चढला.

  झाडाच्या फांद्या कमकुवत होत्या, म्हणून तो खाली पडला आणि एक लाकुड त्याच्या छातीच्या आरपार घुसले. छातीतून रक्त येऊ लागले, पण त्याने हिम्मत नाही हरली. त्याने जबाबदारी निभावत बहिणीचा हात पकडून तिला घरी नेले. अंदाजे 100 मीटर बहिणीचा आधार घेत चालत घरापर्यंत गेला आणि दाराजवळ बेशुद्ध होऊन पडला. बहिणीचा आवाज ऐकुण वडील सखाराम बाहेर आले. ते रागवणारच होते पण बहिणीने सांगितले- पप्पा! भैयाला मारू नका, माझ्या हट्टामुळे भैयाची ही अवस्था झाली आहे. मुलीने सगळी गोष्ट सांगितली, त्यानंतर घरच्यांनी त्यांना रागावले नाही. त्यानंतर त्यांनी मुलाला रूग्णालयात नेले आणि त्यावर उपचार झाला.


  सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली
  जिल्हा रूग्णालयात पोलिसांनी त्याला घडलेल्या प्रकारबद्दल प्रश्न विचारले त्यावर मुलाने सगळा प्रसंग सांगितला आणि उत्तरे दिली.

  बहिणीवर खुप प्रेम करतो भाऊ
  वडील सखारामने सांगितले त्यांचे तीन मुले आहेत, दोन मुले आणि एक मुलगी. सुरज लहान आहे जो बहिणीसाठी बोर तोडायला गेला होता. तो त्याच्या बहिणीवर खुप प्रेम करतो.

  अर्धा इंचाचे लाकुड घुसले
  मुलाच्या छातीत घुसलेल्या लाकडाची जाडी अर्धा इंच आहे. लाकुड अशाप्रकारे घुसले होते की, छातीतला रक्रस्त्राव थांबला होता. जास्त रक्त ना गेल्याने त्याचा जीव वाचला.

Trending