आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसली तरुणी, गाडीवर फेकली शाई; महापोर्टल साईट बंद केल्याचा निषेध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा येथून जात असताना अचानक एक तरुणी त्यामध्ये घुसली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाई फेकली. महाराष्ट्र शासनाने महापोर्टल बंद केल्याचा निषेध व्यक्त करताना तिने हा प्रकार केला आहे. यासोबतच, माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड याच्या संभावित उमेदरीचा सुद्धा कडवा विरोध केला. संबंधित तरुणीला पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले.

मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाई फेकणाऱ्या तरुणीचे नाव शर्मिला येवले असे आहे. ही तरुणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष असल्याचे समोर आले आहे. शर्मिला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून त्यांच्या वाहनावर शाई फेकली. यासोबतच, गेल्या 40 वर्षांतल्या आपल्या सत्तेच्या माध्यमातून माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अकोले तालुक्याचे नंदनवन करण्याऐवजी वाळवंट केल्याचा आरोप तिने केला. त्यामुळे, मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील केली.

तत्पूर्वी शर्मिलाने माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या दुसर्‍या पत्नी कमल पिचड (देशमुख) यांचा निषेध करण्यासाठी सकाळी अकोले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. कमल पिचड यांनी आदिवासी जातीचा खोटा दाखला व त्यावरून कवडीमोल भावात आदिवासींच्या खरेदी केलेल्या जमीनी प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. परंतु, प्रशासनाने उपोषणाला बसण्यास परवानगी नाकारली. तरीही डॉ. किरण लहामटे व समर्थक कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात येण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या ठिकाणाची मोडतोड करून त्यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...