आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: शारीरिक संबंधांनंतर लगेच होतो नराचा मृत्यू, प्रेमाची मोजावी लागते एवढी मोठी किंमत !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क - अॅनाकोंडाचे नाव ऐकताच सगळ्यांच्या मनात एक अत्यंत धोकादायक  आणि अजस्र सापाचे चित्र येते. सर्पवंशातील हा सदस्य आकाराने खूप मोठा असतो. घनदाट जंगलांत याचे वास्तव्य असते. या सापाच्या आकाराप्रमाणेच त्याच्या सेक्स लाइफशी संबंधित काही बाबी खूप रंजक आहेत. अमेरिकेच्या एक युनिवर्सिटीने रिसर्चनंतर सांगितले आहे की, इतर सजीवांच्या तुलनेत अॅनाकोंडा फॅमिलीत मादा आकाराने नरापेक्षा खूप मोठी असते. अनेकदा ती सेक्सनंतर नर अॅनाकोंडाला गिळूनही टाकते.

 

शारीरिक संबंधांनंतर होतो नराचा मृत्यू
- अमेरिकेच्या मेक्सिको हायलँड्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जीजस रिवास यांनी अॅनाकोंडावर संशोधन करून त्याच्या आयुष्याशी संबंधित रोचक फॅक्ट्स जगासमोर आणल्या आहेत. प्रोफेसर स्वत: सर्पतज्ज्ञ - हर्पिटोलॉजिस्ट आहेत. त्यांनी नर आणि मादा अॅनाकोंडावर रिसर्च केला होता.
- रिसर्चदरम्यान त्यांना कळले की, अॅनाकोंडा प्रजातीचे साप जेव्हा रिलेशन (संभोग) बनवतात तेव्हा मादा अॅनाकोंडा ही नरावर भारी ठरते. अनेकदा संभोगानंतर ती नराला गिळूनही टाकते. यापूर्वी असे मानले जात होते की, सेक्सदरम्यान नरच मादावर भारी पडतो.


- प्रोफेसरच्या रिसर्चनुसार, अॅनाकोंडा प्रजातीत मादाचा आकार नरापेक्षा खूप जास्त मोठा असतो. यामुळे त्यांना जास्त अंडे देणे सोपे होते. अनेकदा मादा आकाराने नराच्या तुलनेत 4 ते 5 पट मोठी असू शकते. याच आकारामुळे संधी मिळाल्यावर ती नराला सहजपणे गिळून टाकते.
- नर अॅनाकोंडा प्रणयासाठी मादांचा शोध घेतात. परंतु सापांची दृष्टी ठीक नसते, यामुळे ते वास घेऊन मादाला शोधतात. रिसर्चनुसार, उन्हाळा आणि हिवाळ्यात मादा आपली कात टाकत असते आणि तिचा गंधच नराला मादाबाबत माहिती पुरवतो.


- रिसर्चमधून हेही कळले आहे की, अॅनाकोंडामध्ये सेक्स करण्यासाठी मादाच पुढाकार घेते. हायबरनेशन (सुप्तावस्था) मधून बाहेर आल्यानंतर मादामध्ये फेरोमॉन नावाच्या हॉर्मोनचा स्राव होतो. याच्या मदतीने नराला मादा आसपास असल्याबाबतची माहिती मिळते.

 

 

बातम्या आणखी आहेत...