Home | Khabrein Jara Hat Ke | Female bear served 15 years in Kazakh prison filled with dangerous criminals

घातक अपराध्यांसोबत तुरुंगात बंद आहे एक मादी अस्वल, मागील 15 वर्षांपासून भोगत आहे आपल्या अपराधांची शिक्षा 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 12:39 PM IST

तुरुंगात अस्वलासाठी बनवला गेला आहे प्रायव्हेट स्विमिंग पूल, तिची मूर्तिही लावलेली आहे... 

 • Female bear served 15 years in Kazakh prison filled with dangerous criminals

  अस्ताना : कजाखस्तानमध्ये एक वेगळेच प्रकरण पाहायला मिळाले. इथे माणसांच्या तुरुंगात एक अस्वल जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. ही मादी अस्वल दोन लोकांची शिकार केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवली गेली होती, त्यामुळे मागील १५ वर्षांपासून ही मादी या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

  जेलमध्ये भालूसाठी प्रायव्हेट स्विमिंग पूल...
  - या मादी अस्वलचे नाव ईकैटरीना आहे, जिला जेलमधील इतर कैदी आणि तेथील स्टाफ कात्या या नावाने बोलावतात. तिला माणसांपासून दूर एका वेगळ्या सेलमध्ये ठेवले गेले आहे.
  - तिच्यासाठी एक प्रायव्हेट स्विमिंग पूलदेखील आहे. तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कात्यासाठी खूप कडक सिक्योरिटी आहे आणि मागील 15 वर्षांमध्ये ती खूप सामान्य झाली आहे.
  - अधिकाऱ्यांनी सांगितले की, कात्याला आपल्या रागीट स्वभावामुळे जेलमध्ये यावे लागले. पण ती आता खूप बदलली आहे. जेलमधील इतर कैदी तिला भेटण्यासाठी येतात.
  - कात्या आता जेलची ओळख बनली आहे. यामुळेच जेलमध्ये तिची एक मूर्तिदेखील लावली गेली आहे. एवढेच नाही, तिला कृत्रिम पद्धतीने आई बनवण्याकझही प्रयत्न सुरु आहे.

  या दोन हल्ल्यांमुळे आहे जेलमध्ये...
  - भालूने 2004 मध्ये एका कॅम्पम साइटवर दोन वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या वेळी हल्ला केला होता. जखमी होणाऱ्यांमध्ये 11 वर्षांचा एक मुलगाही होता, कात्याने त्याचे पाय कापले होते.
  - याव्यतिरिक्त कात्याने 28 वर्षांच्या एका व्यक्तीवरही हल्ला करून त्याला मारले होते. आणि तेव्हा तर कात्याचे वय खूप कमी होते.
  - ही घटना तेव्हा झाली होती जेव्हा, एका सर्कर ट्रेनरने तिला सोडून दिले होते. ती खूप रागीट स्वभावाची होती. अशात मग कोर्टानेही तिला जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. कारण आसपास कोणतेही प्राणी संग्रहालय नव्हते.

Trending