आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखळी चोर महाविद्यालयीन तरुणीला अटक, गर्दीत महिलांच्या अंगावर अॅसिड टाकून पळवायची दागिने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावर सौम्य अॅसीड फेकत नंतर सोनसाखळी पळणाऱ्या 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला रविवारी शहरातील फुले मार्केटमधून अटक करण्यात आली. रविवारी दुपारी 1 वाजता ही घटना घडली. हर्षदा किशोर महाजन (वय 19, रा.बोदवड, जि.जळगाव) असे अटक केलेल्या तरुणींचे नाव आहे.
 
हर्षदा गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावर अॅसिड टाकून दागिने पळवायची. रविवारी पुजा ओमप्रकाश व्यास  ही महिला दुपारी मैत्रीणीसह फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेली होती. यावेळी हर्षदाने पाठीमागून येऊन पुजा यांच्या मानेवर सौम्य अॅसीड फेकले. अॅसिडमुळे पुजाच्या मानेवर खास सुटल्याने ती बिथरली. या संधीचा फायदा घेत हर्षदाने तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढला. आपली सोनसाखळी चोरल्याची बाब वेळीच लक्षात आल्यानंतर पुजा व तिच्या मैत्रिणीने शहर पोलिसांच्या मदतीने हर्षदाला रंगेहाथ पकडून दिले. हर्षदा विरोधात विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...