आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाढविणीच्या दुधापासून उपचार, सौंदर्य प्रसाधनांचीही निर्मिती; पुण्यात गेल्या 13 वर्षांपासून एक जण औषधाप्रमाणे पाजतोय दूध 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कष्टाळू प्राणी गाढव भलेही पिढ्यान् पिढ्या हास्य-विनोदाचा विषय ठरले असेल, मात्र त्याच्यात दडलेले अनोखे वैशिष्ट्य कदाचित खूप कमी लोकांना माहीत असेल. गाढविणीच्या दुधात औषधी गुण असतात. या दुधामुळे अनेक जीवाणू व विषाणू संसर्ग रोखण्यात मदत होते व त्याचा फायदा माणसास होतो. 

 

विशेष म्हणजे मानवी दुधापेक्षा ६० टक्क्यांपर्यंत जास्त जीवनसत्त्वे यात असतात. याशिवाय आता या दुधापासून देशात सौंदर्य प्रसाधनेही तयार होऊ लागली आहेत. केरळ व महाराष्ट्रात याचे दोन यशस्वी प्रयोग झाले आहेत. पुण्यातील स्वारगेटपासून तीन किमी अंतरावरील पद्मावती पायथ्यामध्ये रमेश जाधव १३ वर्षांपासून रुग्णांना हे दूध चांदीच्या चमच्यातून औषध म्हणून देत आहेत. हा त्यांचा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. या माध्यमातून त्यांची महिना ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत कमाई होते. आयुर्वेदिक डॉक्टर वासू बहुतांश रुग्णांना या दुधाचा डोस पिण्यासाठी जाधव यांच्याकडे पाठवतात. या संदर्भात डॉ. वासू म्हणाले, गाढविणीच्या दुधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लायसोझाइम एंझाइम असते. यामुळे सर्दी, खोकला, अस्थमा, घशातील संसर्ग, टीबी, जुनाट आजार व फिट्ससारखे अनेक आजार बरे होतात.महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे (टिप्स) ६ विद्यार्थीही गाढवीच्या दुधापासून सौंदर्य प्रसाधने बनवत आहेत. २०१७ मध्ये येथील विद्यार्थिनी पूजा कौलने सहकाऱ्यांसोबत डेअरी फार्म सुरू केले होते. मात्र, हे दूध लवकर खराब होते. त्यामुळे त्यांनी याचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांत करण्याचे ठरवले. त्यांनी तुळजापूर येथून गाढवे पाळणाऱ्या १४ कुटुंबांपासून दूध खरेदी करण्यास सुरुवात केली. या कुटुंबांना यातून महिना १५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. सध्या दर महिन्यास २८ हजार रुपयांहून जास्तीची सौंदर्य प्रसादने विक्री होत आहेत. कोचीतही अशी साैंदर्य प्रसादने ऑनलाइन विक्री होत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...