Home | National | Other State | female gang who stripped and blackmailed men on highways arrested in punjab

हायवेवर या सुंदर तरुणींपासून सावधान! लिफ्ट मागून घरी घेऊन जातात, मग कपडे काढून करतात असे काही...

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 24, 2019, 12:05 PM IST

पोलिसांनी ब्लॅकमेल करणाऱ्या या फीमेल गँगच्या 2 जणींना केली अटक

 • female gang who stripped and blackmailed men on highways arrested in punjab

  होशियारपूर - हायवेवर कुठल्याही अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा अशी घटना नुकतीच समोर आली आहे. पंजाब पोलिसांनी सुंदर तरुणींच्या एका टोळीला सोमवारी जेरंबद केले आहे. तरुणींची ही टोळी कारवालेच नव्हे, तर बाइक चालवणाऱ्यांकडून सुद्धा लिफ्ट मागायच्या. यानंतर आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करायच्या. यांच्या गँगमध्ये तीन पुरुषांचा देखील समावेश होता. ते सध्या फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.


  बाइकरला लिफ्ट मागितली, मग घरात बोलावून काढले कपडे...
  पंजाबच्या एका बाइकस्वार युवकाने पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. पीडित युवक शुक्रवारी बाइकवरून आपल्या घरी जात होता. त्याचवेळी एका तरुणीने आजारी असल्याचे सांगत त्याची बाइक थांबवली तसेच घरी सोडण्यास सांगितले. घराजवळ पोहोचल्यानंतर अतिशय प्रेमाने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. या ठिकाणी आणखी एक तरुणी आधीच उपस्थित होती. त्या दोघींनी मिळून तरुणाला आकर्षित केले आणि त्याचे संपूर्ण कपडे काढले. याच दरम्यान अचानक घरावर तीन जण येऊन धडकले.


  ब्लॅकमेल करून केली 5 लाखांची मागणी
  घरात घुसलेल्या युवकांनी आधी काहीच न सांगता तरुणाला मारहाण सुरू केली. पीडित तरुण इतका घाबरला की तो काहीही करून तेथून सुटण्यासाठी धडपडत होता. यानंतर एकाने युवकाचा अश्लील व्हिडिओ बनवला. हा संपूर्ण कट या गँगने आधीच शिजवला होता. प्लॅननुसार, पीडित तरुणावर बलात्काराचे आरोप केले. तसेच आताच 5 लाख रुपये नाही दिले तर पोलिसांना व्हिडिओ दाखवून गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. कसे-बसे पीडित तरुणाने आपल्या मित्राला बोलावून 30 हजार रुपयांचा बंदोबस्त केला आणि तेथून पळ काढला.


  तरुणींचे भाऊ, पती आणि वडील आहेत फरार आरोपी
  यानंतर थेट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घडलेल्या प्रकरणाची आपबिती सांगितली. पोलिसांनी संबंधित घरावर धाड टाकून दोन्ही तरुणींना अटक केली. परंतु, तीन आरोपी पुरुष त्यांच्या हाती आले नाहीत. आरोपींपैकी एका तरुणीचे नाव रेणू आहे. तिचा भाऊ रोहित, मैत्रीण मनिषा आणि मनिषाचा पती लक्की अशी इतरांची नावे आहेत. पाचवा आरोपी हा मनिषाचा पिता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या सर्वांनी मिळून यापूर्वीही अनेक युवकांना अशाच प्रकारे लुटले आहे.

Trending