Home | International | Other Country | female journalist hacked to death at her home in bangladesh

Murder: बांगलादेशात तरुण महिला पत्रकाराची निर्घृण हत्या; 12 जणांनी घरात घुसून चिरला गळा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 29, 2018, 02:36 PM IST

बांगलादेशात एका टीव्ही चॅनलच्या महिला पत्रकाराची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली.

  • female journalist hacked to death at her home in bangladesh

    ढाका - बांगलादेशात एका टीव्ही चॅनलच्या महिला पत्रकाराची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. सुबर्णा नोदी (32) असे त्या पीडित पत्रकाराचे नाव असून ती Ananda TV साठी काम करत होती. ढाकापासून 150 किमी दूर पाबना जिल्ह्यात ती राहत होती. त्याच ठिकाणी ही घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, रात्री पावणे 11 च्या सुमारास 10-12 हल्लेखोर बेल वाजवून अचानक तिच्या घरात घुसले आणि धारदार शस्त्राने तिचा खून केला. सुवर्णाला एक 9 वर्षांची मुलगी आहे. तसेच तिने आपल्या पतीविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.


    बेल वाजवून घरात घुसले हल्लेखोर...
    पोलिस अधिकारी इब्न-ए मिझान यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 10 ते 12 हल्लेखोर बाइकवर पत्रकार सुबर्णाच्या घरी गेले होते. त्यांनी मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घराची बेल वाजवली. सुवर्णाने दार उघडताच एक-एक करून सगळेच घरात घुसले आणि धारधार शस्त्रांनी तिच्यावर हल्ला केला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत सुबर्णाला उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. परंतु, उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विविध प्रकारचे पथक तयार केले असून हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे. बांगलादेशच्या सर्वच पत्रकारांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सोशल मीडियावर सुद्धा या हल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा आणि कट्टरपंथियांचा हात होता का याचाही पोलिस शोध घेत आहेत.

Trending