आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कैद्यावर तुरुंगात पोलिसाकडून बलात्कार, गोध्रामध्‍ये धक्‍कादायक प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोध्रा - गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील तुरुंगात महिला कैद्यावर एका पोलिस कर्मचाऱ्याने बलात्कार केला. यात ती गर्भवती झाली. पीडितेेच्या तक्रारीवर तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. जागतिक तुरुंग दिनाच्या निमित्ताने (१० अाॅगस्ट) आयोजित कार्यक्रमात पीडितेने न्यायाधीश एच. बी. रावल यांना पत्र लिहून प्रकार सांगितल्यानंतर सत्य समोर आले.

 

न्यायाधीशांनी हेच पत्र महिसागर जिल्हा पोलिस अधीक्षक उषा राडा यांना दिले. त्यांनी महिलेची विचारपूस केली. आरोपीचे नाव निमेश भुनेकर असे आहे. पीडित महिलेला मे २०१८ मध्ये खूनप्रकरणी तुरुंगवास झाला होता.

बातम्या आणखी आहेत...