Home | Maharashtra | Mumbai | Female security guard makes women take off their burkhas in St George's Hospital Mumbai

रुग्णाला भेटण्यासाठी बुरख्यात आलेल्या महिलेला रुग्णालयाने दिला नाही प्रवेश, अशा महिला लहान मुले चोरत असल्याचे सांगितले कारण

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 21, 2019, 12:27 PM IST

नगरसेविकेला देखील बुरखा घालून रुग्णालयात जाण्यास केला मज्जाव

  • मुंबई - श्रीलंकेत ईस्टर दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेनेने मुंबईतही बुरख्यावर बंदी आणण्याचे म्हटले होते. आता याचा परिणामही पाहण्यास मिळत आहे. मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये बुरखा घालून आलेल्या महिलेला हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला नाही. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

    रुग्णाच्या नातेवाईकाने मोबाइलमध्ये हे दृष्य कैद केले आहे. चेंबूर येथील रहिवासी असलेली ही महिला आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली होती. पण तिला गेटवरच अडवण्यात आले. तिने याचे कारण विचारले असता, बुरखा परिधान केलेल्या कोणत्याही महिलेला रुग्णालयात जाण्याची परवानगी नसल्याचे तिला सांगण्यात आले.


    रुग्णालयाने दिले हे स्पष्टीकरण
    या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी स्थानिक नगरसेविका रुकसाना सिद्दीकी देखील बुरखा परिधान करून रुग्णालयात गेल्या. तेव्हा तेथील तैनात महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नगरसेविकेला अडवले. जेव्हा त्यांनी आपली ओळख सांगितले तेव्हा रुग्णालयातील उपस्थित डॉक्टरांनी सांगितले की, बुरखा घातलेल्या महिला लहान बाळाची चोरी करतात. यामुळे रुग्णालयात बुरखा घालून येण्यात बंदी करण्यात आली आहे.

Trending