5 चोरट्याः एकीने / 5 चोरट्याः एकीने दुकानदाराला केले मशगूल, दुसरीने हळूच सरकवले पोते, बाकी करत होत्या देखरेख; असे लुटले हजारोंचे कपडे

दिव्य मराठी वेब टीम

Nov 06,2018 02:48:00 PM IST

अंबाला - शहरच्या एका रेडिमेड गार्मेंट्सच्या शोरूम मध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या 5 महिलांनी कपड्यांचे एक पार्सल चोरून नेले. महिलानी मोठ्या चलाखीने हे पार्सल गायब केले. अतिशय प्लॅनिंगने केलेल्या चोरीची ही घटना दुकानाच्या CCTV मध्ये कैद झाली आहे. दुकानदाराच्या तक्रारीवरून पोलिस तपास करत आहेत.

दुकानदार वैभवने सांगितले की, शनिवारी संध्यकाळी 7.30 वाजता पाच महिला दुकानात खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी तीन पुढे आणि तीन मागे उभ्या होत्या. त्या लेडीज सूट पाहत होत्या. तेथेच सूटने भरलेले एक पार्सल ठेवले होते. त्यात 43 हजार रुपयांचा माल होता.

5 चोरट्यांच्या प्लॅनिंगचा व्हिडिओ पाहून मालकासह पोलिसही शॉक

सूट दाखवत असताना दुकानातील कर्मचारी व्यस्त होते. तर एकीने त्या दुकानदाराला बोलण्यात मशगूल गेले. एक महिला बाहेर ठेवलेले पार्सल पायाने तर कधी हाताने संधी पाहून सरकवत होती. बाकीच्या महिला तिचे संरक्षण करण्यासाठी आजू-बाजूला थांबल्या होत्या. पार्सल सरकवून काम संपताच एकीने इशारा केला आणि बाकीच्या चोरट्यांनी काहीच खरेदी करायचे नाही असे म्हणत निघून गेल्या. त्यानंतर मालकाने बाहेर नजर टाकली तेव्हा पार्सल गायब होते. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर त्याला ही संपूर्ण घटना दिसून आली.

X
COMMENT