आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हैदराबाद - येथे एका वेटरनरी महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केली व मृतदेह जाळून पुलाखाली फेकून दिल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मोहंमद आरिफ, जाेलू नवीन, चंताकुंता आणि जोलू शिवा अशी आरोपींची नावे आहेत. क्लिनिकहून परतल्यावर ही तरुणी दुसऱ्या ठिकाणी कामासाठी गेली. टोल प्लाझावर स्कूटर लावून ती कॅबने गेली होती. परतली तेव्हा स्कूटर पंक्चर होती. तिने याबाबत फोनवर बहिणीला कळवले. मात्र, या फोननंतर ती तरुणी बेपत्ता झाली. गुरुवारी तिचा मृतदेह सापडला. टोल प्लाझाजवळ तरुणीची स्कूटर, कपडे, बूट आणि दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. आरोपींनीच तिची स्कूटर पंक्चर केली आणि तिने मदत मागावी म्हणून ते टोल प्लाझाजवळ वाट पाहत बसले होते. अखेर त्यांनी डाव साधला.
आणखी एक मृतदेह : दरम्यान, ज्या भागात डॉक्टर तरुणीचा मृतदेह सापडला तेथेच गुरुवारी आणखी एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
मला त्यांची भीती वाटतेय...
पीडितेने बहिणीला फोन करून काही लोकांची भीती वाटत असल्याचे कळवले होते. बहिणीने सांगितले, 'मी तिला टोल बूथवर थांब म्हणून सांगितले. नंतर पाच मिनिटांनी मी तिला फोन केला. तोच बंद होता. मी तिला टोल प्लाझावर शोधले. रात्री साडेतीनपर्यंत आम्ही तिला शोधत होतो. मात्र, ती सापडली नाही.
गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
या तरुणीने धोका लक्षात येताच बहिणीऐवजी पोलिसाला फोन केला असता तर तिला वाचवता आले असते, असे वक्तव्य तेलंगणाचे गृहमंत्री मो. महमूद अली यांनी केल्याने वाद पेटला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.