आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - आपण रात्री रस्त्यावर असताना अचानक एक तरुणीने माझ्यावर बलात्कार झाला म्हणत मदत मागितल्यास काय कराल? आपण कोणत्या मानसिकतेच्या समाजात वावरतो हे त्या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट होईल. भारत असो की जगातल्या कानाकोपऱ्यातील कुठलाही देश... महिलांची अवस्था सारखीच आहे. लेबनानमध्ये असाच एक प्रसंग घडला. यात रात्री एक बलात्कार पीडित तरुणी रस्त्यावर साश्रू नयनांनी लोकांना मदतीची भीक मागत होती. परंतु, लोकांनी तिची मदत करणे सोडून तिचे कपडे आणि फॅशनवर टीका करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी तिचा गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न केला. तर काहींनी हे नक्कीच तुझं पहिल्यांदा नसेल अशी विधाने केली.
एकाने गैरफायदा घेण्याचाही केला प्रयत्न... ऐकायला मिळाले असे काही...
- लेबनानच्या एका तरुणीने सोशल एक्सपेरिमेंट म्हणून एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओतून तिने लोकांची मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न केला. एखाद्या तरुणीवर बलात्कार होत असेल तर लोक तिच्याच कॅरेक्टरवर संशय घेतात हे या व्हिडिओतून दिसून येते.
- या तरुणीने व्हाइट टॉप आणि लाल स्कर्ट घातला होता. टॉपचे बटन तुटलेले आणि डोळ्यांत अश्रू घेऊन ही महिला ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला मदत मागत होती. पण, लोकांनी तिची मदत करणे सोडून तिचे फॅशन आणि कपड्यांवर टीका केली. एकाने तिला रात्री असे कपडे घालून फिरतात का? असे उपदेश दिले. एकाने तर तिला ड्रग्स घेतलेस का असा सवाल केला.
- दुसऱ्या एका व्यक्तीने हद्दच केली. तो तिच्या अंगावर धावून गेला आणि ही एक कॅरेक्टरलेस महिला असून नक्कीच हिच्यासोबत हे पहिल्यांदा झालेले नसावे अशा शब्दांत अपमान सुरू केला. एक तरुण असाही होता की ती मदत मागण्यासाठी गेली तेव्हा तिचा हात धरण्याचा प्रयत्न करत होता. तिला जवळ घेऊन त्याने गैरफायदा घेण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या हातातून निसटून ती दुसऱ्या गल्लीत गेली. त्या ठिकाणी काही महिला दिसून आल्या.
- महिला आपली मदत करतील अशी अपेक्षा तिला होती. काहींनी तिचे फाटलेले कपडे पाहून जॅकेट सुद्धा दिली. मग आपल्यातच चर्चा सुरू केली की हिने ड्रग्स घेऊन मित्रासोबत कांड केला असावा. बाजूलाच थांबलेल्या महिलांनी तिला बोलावले आणि तिचे कपडे पाहून उपदेश देण्यास सुरुवात केली. तू असे कपडे घालून बाहेर फिरायला नको होते असे म्हणत तिलाच दोष देण्यास सुरुवात केली.
شو صار بالشارع لمّا بنت تعرّضت للإغتصاب؟ #مين_الفِلتان؟ @AbaadMENA تطلق حملة تُنصِفُ فيها المرأة المُغتصبة #لبنان
— Rima Maktabi (@rimamaktabi) November 5, 2018
#ابعاد #ShameOnWho #minelfelten pic.twitter.com/Cd0znNGyWS
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.