आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी आणि बिझनेसमध्ये समस्या असल्यास घर किंवा ऑफिसमध्ये ठेवा फेंगशुईचा उंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेंगशुई एक चायनीज शब्द असून याचा अर्थ वायू आणि जल असा आहे. फेंगशुई चीनचे वास्तुशास्त्र आहे. घराचे बांधकाम कशाप्रकारे करावे, घराला सुंदर कसे बनवावे, घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत इ. गोष्टींची माहिती यामध्ये आहे. फेंगशुईमध्ये अशा विविध वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या घरात ठेवल्याने जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. उदा. विंड चाइम, लाफिंग बुद्धा इ. यामधील आणखी एक गोष्टी म्हणजे फेंगशुईचा उंट. येथे जाणून घ्या, या उंटाचे खास फायदे...


यामुळे ऑफिसमध्ये ठेवावा उंटाचा शो-पीस
फेंगशुईनुसार, उंटाची मूर्ती ऑफिस किंवा घर दोन्ही ठिकाणी ठेवली जाऊ शकते. ज्या लोकांच्या नोकरी आणि बिझनेसमध्ये सर्वकाही ठीक चालू नसेल त्यांनी अडचणी आणि विरोधकांना दूर ठेवण्यासाठी ऑफिसमध्ये उंट ठेवावा.


घरामध्ये उंटाचा शो-पीस ठेवल्याने होऊ शकतो धनलाभ
घरामध्ये उंटाचा शोपीस ठेवल्याने पैशांशी संबंधित अडचणी कमी होऊ शकतात. उंटाची जोडी घरात ठेवल्यास लवकर पैशाशी संबंधित कामामध्ये फायदा होतो. फेंगशुईनुसार उत्तर-पश्चिम दिशेला उंटाचा शोपीस ठेवल्यास सकारात्मक प्रभाव राहतो.


संघर्षाचे प्रतीक आहे उंट
फेंगशुईनुसार, उंट संघर्षाचे प्रतीक आहे. वाळवंटामध्ये उंटाचा सर्वात जास्त उपयोग केला जातो, यासोबतच हा एक कुशल मार्गदर्शकाचे काम करतो. यामुळे फेंगशुईमध्ये मानले जाते की, उंटाचा शो-पीस  जीवनातील कठीण परिस्थितीमधून बाहेर काढण्यास सहायक ठरतो.

बातम्या आणखी आहेत...