आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात माशाची जोडी ठेवल्याने मिळू शकते नोकरीत प्रमोशन, लव्ह लाइफसाठीही आहे खास टीप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेंगशुई चीनचे वास्तुशास्त्र आहे. याला चीनची दार्शनिक जीवनशैली असेही म्हटले जाते. तुम्हालाही घरामध्ये सुख-समृद्धी हवी असल्यास फेंगशुईच्या सोप्या टिप्स फॉलो करू शकता. बाजारात फेंगशुईशी संबंधित विविध वस्तू उपलब्ध आहेत. येथे जाणून घ्या, खास टिप्स...


1. माशांची जोडी घरात लटकावून ठेवणे शुभ मानले जाते. याच्या प्रभावाने घरात धनलाभ आणि नोकरीत प्रमोशन मिळू शकते.


2. लव्ह बर्ड, मँड्रेन डक यासारखे पक्षी प्रेमाचे प्रतीक आहेत. यांच्या छोट्या मूर्तीची जोडी आपल्या बेडरूममध्ये ठेवू शकता. यामुळे दाम्पत्य जीवन सुखी राहील.


3. घराच्या सुख-शांतीसाठी तीन हिरवे रोपटे मातीच्या भांड्यात घराच्या आत पूर्व दिशेला ठेवावेत. लक्षात ठेवा फेंगशुईमध्ये बोन्साय आणि कॅक्टसच्या झाडांना हानिकारक मानले जाते. कारण बोन्साय प्रगतीमध्ये बाधक आणि कॅक्टस हानिकारक मानले जाते. यामुळे चुकूनही हे झाड घरात ठेवू नये.


4. घराच्या पूर्वोत्तर भागात तलाव किंवा कारंजा असणे शुभ राहते. फेंगशुईनुसार याच्या पाण्याचा प्रवाह घराकडे असावा, घराच्या बाहेर असू नये.

बातम्या आणखी आहेत...