Home | Jeevan Mantra | Jyotish | Vastu Shastra | Fengshui Tips For Money Problems In Marathi

तीन पायांचे बेडूक असते भाग्यशाली परंतु किचनमध्ये ठेवण्याची चूक करू नका

रिलिजन डेस्क | Update - Aug 07, 2018, 12:02 AM IST

फेंगशुई (चीनचे वास्तुशास्त्र)मध्ये धन आणि सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत.

 • Fengshui Tips For Money Problems In Marathi

  फेंगशुई (चीनचे वास्तुशास्त्र)मध्ये धन आणि सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास घरामध्ये नेहमी सकारात्मक उर्जेचा प्रवाह राहतो तसेच आरोग्याचे विशेष लाभ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, फेंगशुईशी संबधित 6 वस्तूंची माहिती. या वस्तू घरामध्ये ठेवणे शुभ मानले जाते.


  भाग्यशाली तीन पायांचे बेडूक -
  तीन पायांचा बेडूक खूप भाग्यशाली मानला जातो. फेंगशुईनुसार तोंडात नाणे असणारा तीन पायांचा बेडूक घरामध्ये असणे शुभ मानले जाते. हे बेडूक घरामध्ये मुख्य दरवाजाच्या जवळपास ठेवावा. हे बेडूक स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये ठेवू नये. असे करणे दुर्भाग्याला आमंत्रित करते.


  समृद्धीचे देवता लाफिंग बुद्धा
  जर तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर लाफिंग बुद्धा निश्चितच तुमची मदत करेल. घराच्या हॉलमध्ये मुख्य दरवाजाच्या तिरक्या दिशेला एक लाफिंग बुद्धा ठेवा. असे केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी वाढते. लक्षात ठेवा, लाफिंग बुद्धा मुख्य दरवाजाच्या एकदम समोर ठेवू नये. याच्या हास्यामध्ये समृद्धी मानली जाते. फेंगशुई शास्त्रानुसार ही मूर्ती घरातील माणसांचे दुःख आपल्या पोटात घेते आणि आनंद देते.


  गोल्डन फिश
  फेंगशुई मान्यतेनुसार घरामध्ये मासे ठेवल्याने सौभाग्य वाढते. धन, मन-सन्मानामध्ये वृद्धी करण्याचा हा एक प्रभावी उपाय मानला जातो. गोल्डन फिश बेडरूम, किचन किंवा बाथरूममध्ये ठेवू नये. घराच्या मुख्य खोलीमध्ये गोल्डन फिश ठेवावेत.


  ड्रॅगनची जोडी -
  फेंगशुई शास्त्रानुसार ड्रॅगनची जोडी समृद्धीचे प्रतिक आहे. यांच्या पायांच्या पंजामधील मोत्यामध्ये सर्वात जास्त उर्जा असते. फेंगशुईमध्ये ड्रॅगनला चार दिव्य प्राण्यांमध्ये गणले जाते. ड्रॅगन येंग म्हणजे पुरुषत्व, धाडस आणि पराकारामचे प्रतिक असून यामध्ये अपार शक्ती असते. ड्रॅगनची जोडी कोणत्याही दिशेला ठेवली जाऊ शकते


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर वस्तूंची माहिती....

 • Fengshui Tips For Money Problems In Marathi

  समृद्धी घेऊन येतात तीन नाणे -
  फेंगशुईनुसार घराच्या दरवाजावर लाल रिबीनमध्ये बांधलेले तीन नाणे लटकवल्याने घरामध्ये धन आणि समृद्धी येते. लक्षात ठेवा तीन नाणेच लावा तेही दरवाजाच्या आतील बाजूस. बाहेरच्या बाजूने नाणे लावल्यास लक्ष्मी दारातच थांबते.

 • Fengshui Tips For Money Problems In Marathi

  आनंदाचे प्रतिक कासव
  फेंगशुई शास्त्रामध्ये कासवाला शुभ मानले जाते. हे घरात ठेवल्यास यशासोबतच धन आणि समृद्धी प्राप्त होते. ऑफिस किंवा घराच्या उत्तर दिशेला हे कासव ठेवावे.

Trending