Health / उन्हापासून बचाव करण्यासाठी दररोज प्या बडीशेपचे पाणी

बडीशेपच्या दाण्यांमध्ये डाययुरेटिक गुण असतात. हे युरीनसंबंधी समस्या दूर करतात.

दिव्य मराठी

Jun 06,2019 12:10:00 PM IST

दररोज उपाशीपोटी बडीशेपचे पाणी पिणे प्रत्येक ऋतुमध्ये अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात हे पिल्याने उष्माघातापासून बचाव होईल. जाणून घ्या याचे काही फायदे...


मुत्राशयासंबंधी समस्या
बडीशेपच्या दाण्यांमध्ये डाययुरेटिक गुण असतात. हे युरीनसंबंधी समस्या दूर करतात. निर्विषीकरणातही ते मदत करतात. नियमितपणे हे पिल्याने यकृताशी संबंधित रोग दूर होतात.


उन्हापासून बचाव
बडीशेपपासून तयार केलेले पाणी थंड असते. यात वेलची पावडर टाकून पिल्याने उन्हापासून बचाव होतो. या पाण्यात काळे मीठ टाकून पिल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.


वजन कमी होईल
बडीशेपच्या पाण्यात एक चमचा मध टाकून रिकाम्या पोटी पिल्याने वजन झपाट्याने घटते. यामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत मिळते.


असे बनवा बडीशेपचे पाणी
एक ग्लास पाणी घेऊन त्यात बडीशेप टाका आणि रात्रभरासाठी झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या.

X
COMMENT