आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Feroz Khan Birth Anniversary Feroz Khan Married A Single Mother Left Her And Children For Air Hostess

सिंगल मदरसोबत फिरोज खान यांनी केले होते लग्न, पण नंतर एअरहोस्टेससाठी सोडले होते पत्नी आणि मुलांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता फिरोज खान यांची आज 79वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. 25 सप्टेंबर 1939 रोजी बंगळुरु येथे जन्मलेले फिरोज खान यांच्या खासगी आयुष्याला वादाची किनार राहिली आहे. विवाहीत असूनदेखील एअर होस्टेस ज्योतिका धनराजगिरसोबत फिरोज खान लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते, यासाठी त्यांनी पत्नी आणि आपल्या दोन मुलांना सोडले होते. पण ज्योतिका आणि फिरोज यांचे नाते पुढच्या टप्प्यावर गेले नाही आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर काही वर्षांनी फिरोज आणि त्यांची पत्नी सुंदरी यांचाही घटस्फोट झाला. 

 

खासगी आयुष्यामुळे राहिले कायम चर्चेत... 
- फिरोज खान अभिनयाशिवाय त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत अभिनय करण्यासाठी दाखल झाले.
- 1960 साली 'दीदी' चित्रपटातून त्यांनी अॅक्टींग करीअरची सुरुवात केली आणि त्याच्या पाच वर्षांनी म्हणजे 1965 साली सुंदरीसोबत त्यांनी लग्न केले. 
- एका पार्टीत सुंदरीसोबत फिरोज खान यांची भेट झाली होती. त्यांचे अफेअर सुरु झाले आणि पाच वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी लग्न केले. सुंदरी आणि फिरोज यांची लैला खान आणि फरदीन खान ही दोन मुले आहेत. 
- लग्नाच्या काही वर्षांनी फिरोज खान यांची भेट एअरहोस्टेस ज्योतिका धनराजगिरसोबत झाली. ज्योतिकाला पाहताच फिरोज तिच्यावर फिदा झाले. ज्योतिकाच्या वडिलांचे नाव राजा महेंद्र धनराजगिर होते. ज्योतिकासोबत अफेअर असल्याचे कळल्यानंतर सुंदरी फिरोज खान यांच्यावर नाराज झाल्या आणि त्यांनी या नात्याला आपला विरोध दर्शवला. पत्नीचा विरोध बघता, फिरोज सुंदरी आणि मुलांना सोडून ज्योतिकासोबत बंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहू लागले होते.

 

10 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले होते फिरोज आणि ज्योतिका.. 
- फिरोज खान ज्योतिकासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागले होते. दहा वर्षे दोघे एकमेकांसोबत राहिले पण जेव्हाही ज्योतिका लग्न करण्यास बोलत असे तेव्हा फिरोज ती गोष्ट टाळत असत.

- फिरोज यांच्या अशा वागण्याने ज्योतिकाला वाटले की, फिरोज तिच्याशी लग्न करणार नाहीत. मग तिने फिरोजसोबत असलेले नाते तोडण्याचे ठरवले.

- एका मुलाखतीदरम्यान जेव्हा फिरोज यांना ज्योतिकाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी ज्योतिकाला ओळखत नसल्याचे सांगितले.

- जेव्हा ही गोष्ट ज्योतिकाला कळली तेव्हा ती फिरोज यांच्यासोबत असलेले नाते तोडून लंडनला निघून गेली. 


पुन्हा होऊ शकली नाही फॅमिलीसोबत चांगली बाँडिंग..
- ज्योतिकासोबत नाते तुटल्यानंतर फिरोज पत्नी सुंदरीकडे परतले. त्यानंतर सुंदरीच त्यांच्यासाठी परफेक्ट होती असे त्यांना वाटू लागले, पण तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता.

- सुंदरीसोबत त्यांचे नाते पुर्वीसारखे पुन्हा होऊ शकले नाही.

- फिरोज यांनी सुंदरीसोबत प्रेमविवाह केला होता. पाच वर्षांच्या डेटींगनंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

- लग्नानंतर 1970 साली पहिली मुलगी लैलाचा जन्म झाला त्यानंतर 1974 साली फरदीन खानचा जन्म झाला.

- लग्नाच्या 20 वर्षानंतर फरदीन आणि सुंदरी यांनी घटस्फोट घेतला. 


सुंदरी विवाहित आणि एका मुलीची होती आई... 
- फिरोज खान यांची पत्नी सुंदरी हिचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या लग्नापासून तिला सोनिया नावाची एक मुलगी होती. फिरोज आणि सुंदरी यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती.

- सोनियाने फिरोज खान यांच्या चित्रपटांमध्ये प्रॉडक्शन टीम म्हणून काम पाहिले. सोनियाचे लग्न बिझनेसमन राजेंद्र सेठीयासोबत झाले होते. एका अपघातात सोनियाचा मृत्यू झाला. - फिरोज यांची मुलगी लैलाचे लग्न फरहान फर्निचरवालासोबत झाले आहे. फरहान फर्निचरवाला हा पूजा बेदीचा पुर्वाश्रमीचा पती आहे.

- फरदीन खानने अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशासोबत प्रेमविवाह केला आहे.

- फिरोज यांची गर्लफ्रेंड ज्योतिकाची बहीण सबरीना धनराजगिरने फिरोज खान यांचा चित्रपट 'यल्गार' (1992) मध्ये कॉश्च्यूम डिझायनर म्हणून काम केले होते. 


या चित्रपटात केले आहे काम...
- फिरोज खान यांनी 1960 ते 1980 याकाळात 'रिपोर्टर राजू' (1962), 'सुहागन' (1964), 'ऊंचे लोग' (1965), 'आरजू' (1965), 'औरत' (1967), आदमी और इंसान' (1969), 'मेला' (1971), 'खोटे सिक्के' (1974), धर्मात्मा (1975) यांसारख्या चित्रपटात काम केले. 2007 साली 'वेलकम' चित्रपटात त्यांनी शेवटचे काम केले. दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'अपराध' (1972), 'धर्मात्मा' (1975), 'कुर्बानी' (1980), 'जांबाज' (1986), 'दयावान' (1988), 'यलगार' (1992), 'प्रेमअगन' (1998) और 'जानशीन' (2003)यांसारखे चित्रपट बनवले. 

- 27 एप्रिल 2009 साली त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...