Home | Business | Auto | ferrari came in india

राजेशाही कारचे भारतात आगमन....

Bhaskar Network | Update - May 27, 2011, 01:53 PM IST

फेरारीने भारतात '४५८ इटालिया', '५९९ जीटीबी फियोरानो', 'कॅलिफोर्निया' आणि जागतिक बाजारपेठेत नुकतीच आलेली 'एफएफ' असे प्रसिध्द आणि लोकप्रिय मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत आणली आहेत

  • ferrari came in india

    नवी दिल्ली- जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि कार प्रेमींच्या सर्वात आवडीच्या आणि श्रीमंती थाटाच्या फेरारी कारचे गुरूवारी भारतात दिमाखदार पर्दापण झाले आहे.
    फेरारीने भारतात '४५८ इटालिया', '५९९ जीटीबी फियोरानो', 'कॅलिफोर्निया' आणि जागतिक बाजारपेठेत नुकतीच आलेली 'एफएफ' असे प्रसिध्द आणि लोकप्रिय मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत आणली आहेत. या गाडयांची किंमत २.२ कोटी रूपयांपासून पुढे असेल. श्रेयांस गु्रप हे भारतातील फेरारी गु्रपचे अधिकृत विक्रेते असतील.
    आतापर्यंत जगातील एकूण ५७ देशांमध्ये फेरारी पोहोचली आहे. येत्या दोन वर्षात भारतात कंपनीने १०० गाड्या विकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे असे फेरारीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेडियो फेलिसा यांनी सांगितले.
    सर्वप्रथम दिल्ली आणि त्यानंतर मुबंई मध्ये कंपनी आपले शोरूम सुरू करणार आहे.Trending