आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रहाट पाळणा फिरत असताना अचानक उलटली एक ट्रॉली, हवेत लटकले एकाच कुटूंबातील तीन लोक...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

योक्याकार्ता- इंडोनेशियातील योक्याकार्ता शहरात काही दिवसांपूर्वी रहाट पाळण्यावरून ट्रॉली उलटल्याने एक दामपत्य आणि त्यांचे मुल निसटले होते. ट्रॉली उलटली तेव्हा ते तिघे तीन सिंटांवरून पडून एका ट्रॉलीच्या छतावर पडले. त्यानंतर जवळपास आर्धातास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ही घटना 12 नोव्हेंबरला घडली असुन तिघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.

 

रहाट पाळणा फिरत असताना उलटली एक ट्रॉली 

> रात्रीच्या वेळी एका कार्यक्रमात लोक रहाट पाळण्यात बसून आनंद घेत होते. त्यावेळी अचानक खाली-वर दोन ट्रॉलींमुळे एक ट्रॉली उलटी झाली आणि ट्रॉलीमध्ये असलेले एक दामपत्य त्यांच्या मुलासोबत खालच्या ट्रॉलीच्या छतावर जाऊन पडले.

> हवेत लटकल्यानंतर ते  खाली पडणार तेवढ्या वेळात रहाट पाळणा ऑपरेटरने पाळणा बंद केला. त्यानंतर लगेच पाळण्यावर काम करणारे लोक तिघांना वाचवण्यासाठी तिथे पोहचले. आणि तिघांनाही सुरक्षितपणे तिथून बाहेर काढण्यात आले.  
> तिथे उपस्थित एका व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर शेअर केला. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...