आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनमधील सणवार : 3 जूनला शनी जयंती आणि याच महिन्यात आहे वटसावित्री पौर्णिमा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन महिना जूनमध्ये विविध खास तिथी जुळून आल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच शनी जयंती असून याच महिन्यात सर्वात महत्त्वपूर्ण एकादशी निर्जला एकादशीसुद्धा याच महिन्यात आहे. मान्यतेनुसार या खास तिथींना संबंधित देवी-देवतांची पूजा केल्याने घर-कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहते. पंचांगानुसार जाणून घ्या, जून 2019 मधील खास तिथी आणि सणवार...


- सोमवार, 3 जूनला अमावस्या आहे. याच दिवशी शनी जयंती आहे. या तिथीला पितर देवतांसाठी तर्पण आणि श्राद्ध कर्म करावे. अमावास्येला धूप-ध्यान करण्याची प्रथा आहे. शनी जयंतीला शनिदेवासाठी विशेष दान-पुण्य करावे. सोमवारी अमावस्या असल्यामुळे ही सोमवती अमावस्या मानली जाते. यामुळे या दिवशी महादेवाची विशेष पूजा करावी.


- गुरुवार, 6 जूनला विनायकी चतुर्थी व्रत आहे. या दिवशी भगवान श्रीगणेशाची विशेष पूजा करून उपवास करावा.


- मंगळवार, 11 जूनला महेश नवमी आहे. मान्यतेनुसार हा दिवस महादेवाच्या पूजेसाठी विशेष आहे.


- बुधवार, 12 जूनला गंगादशहरा आहे. या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करण्याची प्रथा आहे. गंगा नदीमध्ये स्नान करणे शक्य नसल्यास एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे.


- गुरुवार, 13 जूनला निर्जला एकादशी आहे. या तिथिला भगवान विष्णूंचे व्रत करावे. या एकादशीला खूप महत्त्व आहे कारण या दिवशी पाण्याशिवाय व्रत केले जाते. ही एकादशी केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे.


- रविवार, 16 जूनला ज्येष्ठ मासातील पौर्णिमा आहे. यालाच वटपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात.


- सोमवार, 17 जूनला संत कबीर यांची जयंती आहे.


- गुरुवार, 20 जूनला संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विधिव्रत पूजा केली जाते. व्रत-उपवास करण्याची प्रथा आहे.


- शनिवार, 29 जूनला योगिनी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा करावी.

बातम्या आणखी आहेत...