आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटातील धारणी, चिखलदरा तालुक्यातील ११६ पैकी ८६ ग्रामपंचायतींना फायबर आॅप्टिक कनेक्टिव्हीटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मेळघाटातील धारणी, चिखलदरा येथील ११६ पैकी ८६ ग्रामपंचायतींना आतापर्यंत भारत दूर संचार निगमद्वारे (बीएसएनएल) फायबर आॅप्टिक कनेक्टिव्हीटी देण्यात आल्याने या भागातील बहुतांश अडचणी संपुष्टात आल्या आहेत. विशेषत: येथे नरेगांतर्गत काम करणारे कामगार मोठ्या संख्येत आहेत. त्यांना मजुरी देण्यात इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसल्याने अडचणी यायच्या त्याही आता मोठ्या प्रमाणात दूर झाल्या आहेत. 


इंटरनेट, मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे आजवर मेळघाटात असलेल्या गावांचा मुख्यालय अमरावतीशी संपर्क नसायचा. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात सुव्यवस्था राखणे, आणीबाणीच्या प्रसंगी मदत पोहोचविण्यासोबतच संदेशांची देवाण-घेवाण करण्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागायचा. ही प्रमुख अडचण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने बीएसएनएल आणि रिलायन्स जीओला या भागात मोबाइल टाॅवर उभारण्यास सांगितले. त्याअंतर्गतच ११६ पैकी ८६ ग्रामपंचायतींपर्यंत आतापर्यंत फायबर आॅप्टिक जाळे पोहोचले आहे. अद्यापही ३० ग्रामपंचायतींमध्ये काम शिल्लक आहे कारण त्या फारच दुर्गम जागेत आहेत. मात्र आम्ही त्यांनाही जोडण्यासाठी बीएसएनएल आणि रिलायन्स जिओला निर्देश िदले असून ते कामही ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी िदली. 


सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे मेळघाटातील दुर्गम भागात पोहोचणे तसेच साहित्य पोहोचविणे अवघड आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर तेथील कामांना सुरुवात होणार आहे. विशेष बाब अशी की, जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारामुळे वन विभागानेही सकारात्मक भुमिका ठेवली असून बीएसएनएल, रिलायन्स जिओचे मोबाइल टाॅवर उभारणे शक्य झाले आहे. चिखलदऱ्यानंतर मध्ये बराच मोकळा भाग असून त्यानंतर दुसरीकडे धारणी आहे. त्यामुळे या मधील भागात टाॅवर उभारले तर धारणी, चिखलदरा एकमेकांना जोडले जातील त्यासोबतच त्यांचा मुख्यालयाशीही संबंध नेहमीसाठी जुळलेला असेल. यामुळे अनेक कार्यालयीन कामे अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील, अशी आशा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 


मजुरांची मजुरी, निधी, अनुदान पोहोचविणे सोपे

मेळघाटातील दूरवर असलेल्या गावांपर्यंत दूरध्वनी, मोबाइलद्वारे संपर्क साधणे कठीण होते. तसेच तेथील इंटरनेट सेवाही कनेक्टिव्हीटीमुळे ठप्पच असायची कारण मोबाइल टाॅवर नव्हते. आता बीएसएनएल व रिलायन्स जिओ मोबाइलच्या सेवेद्वारे फायबर आॅप्टीकचे जाळेच उभारण्यात आल्याने २४ ब्राॅडबॅण्डची कनेक्टिव्हीटी आणि व्हाॅट्सअॅप चालतील. अशाप्रकारे इंटरनेट सेवाही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मनरेगांतर्गत तेथे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांना रोजगार हमीवर असलेल्या कामगारांची मजुरी पाठविणे, विविध कामांसाठी निधी, अनुदान उपलब्ध करून देणे आता सोपे झाल्याने विकासाच्या वाटाही खुल्या झाल्या आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून जगाची ओळख आणि शिक्षणासाठी उपयुक्त इतर सर्वच प्रकारच्या संदेशाची देवाण-घेवाणही आता अडथळाविरहीत होणार आहे. 

 

ब्राॅडबॅण्ड कनेक्टिव्हीटीने 'व्हाॅट्सअॅप काॅल' 
इंटरनेटचे जाळे ब्राॅडबॅण्ड कनेक्टिव्हीटीद्वारे मेळघाटातील दुर्गम भागातील ज्या ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. त्यांना किमान व्हाॅट्सअॅप काॅल करून तेथील परिस्थितीची माहिती मुख्यालयापर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे गरजेनुसार मदत करणे शक्य झाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यालगतच आहे. 
- अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी, अमरावती. 

 

बातम्या आणखी आहेत...