Home | International | Pakistan | fifteen-person-killed-in-pakistan

बदल्याच्या इराद्याने पाकिस्तानजवळ १६ लोकांना जिवंत जाळले

वृत्तसंस्था | Update - May 21, 2011, 11:31 AM IST

लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी १६ लोकांना जिवंत जाळण्यात आले.

  • fifteen-person-killed-in-pakistan

    लंडन - अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान सीमेनजीक असलेल्या एका गावात दहशतवाद्यांनी एका तेलाच्या टॅंकरला शनिवारी आग लावून दिली. यामध्ये कमीत कमी १६ लोक जिवंत जळाले आहेत. अल-कायदाचो म्होरक्या ओसामा बिन लादेन यांच्या हत्येनंतर बदला घेण्याच्या हेतूने ही आग लावण्यात आल्याचे मानण्यात येत आहे.    ओसामाच्या मृत्यूनंतर अल-कायदाची सूत्रे सांभाळणाऱया सैफ अल अदल लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्या करण्याची योजना तयार करीत असल्याची माहिती पुढे आलीये. सैफने त्याच्या समर्थकांना लंडन शहरावर हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. अदल याने ओसामाच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथच घेतलीये. तालिबानचे प्रवक्ते एहसानुल्लाह एहसान यांनीही लंडनवर हल्ला करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.Trending