Home | National | Madhya Pradesh | fifth class student abused on the way back home a day before diwali

पाचवीच्या मुलीवर बलात्कार करून हातात ठेवले 10 रुपये; म्हणाला, उद्या पुन्हा भेट...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 06:02 PM IST

आरोपीने 10 रूपयाचे अमीष दाखवूव तिला सायकलवर बसवले.

  • fifth class student abused on the way back home a day before diwali

    हरदा - मैत्रिणीच्या घरी रांगोळी काढून एक चिमुकली घरी येत होती. तेव्हा एका अज्ञाताने तिला बाजारात फिरवतो असे सांगत निर्जनस्थळी नेले. आणि तिच्यावर बलात्कार केला. अवघ्या पाचवीला असलेल्या या मुलीवर अत्याचार करून त्या नराधमाने तिच्या हातात 10 रुपये ठेवले. तसेच पुन्हा पैसे हवे असतील तर उद्या पुन्हा याच ठिकाणी भेट असे सांगत निघून गेला. पीडीत मुलीने आपल्यावर घडलेला संपूर्ण अत्याचार मावशीला सांगितला. तिनेच पीडितेला पोलिसांकडे नेऊन बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर कैलाश नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली.

    10 रुपयांचे आमीष देऊन सायकलवर बसवले
    पीडित मुलगी दिवाळी निमित्त 6 नोव्हेंबरला संध्याकाळी घराजवळ राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी रांगोळी काढायला गेली होती. परत येताना त्या परिसरातच राहणाऱ्या कैलाशने तिला अडवून फिरवण्याचे सांगितले. यानंतर 10 रुपयांचे अमीष देऊन तिला सायकलवर बसवले. यानंतर निर्जनस्थळी अज्ञात स्थळी घेऊन गेला, आणि तिच्यावर आत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर बलात्कार आणि अल्पवयीन मुलांवर अत्याचार विरोधी कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending