आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचितने दावा केलेल्या जागांवर एमआयएमचे उमेदवार, पक्षाची पाचवी यादी जाहीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएमची पाचवी यादी जाहीर केली, ज्यात औरंगाबाद शहरातील तीनही मतदारसंघाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. औरंगाबाद पूर्व गफार कादरी, औरंगाबाद मध्य नासेर सिद्दीक्की आणि औरंगाबाद पश्चिम अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघावर दावा केला होता. त्या जागेवरही एमआयएमने उमेदवार घोषित केल्याने दोन्ही पक्षांची पुन्हा आघाडी होण्याची आशा धूसर झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...