आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफ्टी-फिफ्टी फाॅर्म्युला ठरलाच नाही; गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांना टोला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी युती हाेणार असली तरी अद्याप जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे ५०: ५० चा विषयच येत नाही, असे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या फाॅर्म्युल्यासाठी अाग्रही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टाेला लगावला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल. उगाच काेणी त्यात मत मांडू नये, असाही चिमटा घेतला.  महाजनादेश यात्रेचा समारोप १९ सप्टेंबर राेजी नाशिकमध्ये हाेणार असून त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे तूर्तास ठरले आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर सभेसाठी तपाेवनाची जागा निश्चित केली असून त्याची पाहणी पालकमंत्री महाजन यांनी केली. या वेळी त्यांना खासदार राऊत यांनी युतीत जागावाटपाचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असल्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने विचारले असता, त्यांनी असे काहीही ठरले नसल्याचे मत व्यक्त केले. लाेकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप-सेनेची युती व्हावी, अशी दाेन्ही पक्षांतील नेत्यांची इच्छा आहे.  मित्रपक्षांचे नेते रामदास आठवले, विनायक मेटे, सदाभाऊ खोत आदींसमवेत चर्चा सुरू आहे. राज्यातील २८८ जागांपैकी भाजपचे १२३ तर शिवसेनेचे ६२ आमदार आहेत. त्यामुळे काही जागांबाबत मतभेद असले तरी लवकरच ताेडगा निघेल. मात्र,  युतीला कुठलाही धक्का पोहोचणार नाही. जागावाटपाबाबत शहा, फडणवीस व ठाकरे ठरवतील तोच अंतिम निर्णय असेल, असेही स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...