Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | fig eating health benefits in Marathi

अंजीर : वजन कमी करण्यासाठी उत्तम स्नॅक्स, होतात इतरही फायदे 

रिलिजन डेस्क, | Update - Jul 28, 2019, 12:20 AM IST

अंजिरामध्ये भरपूर अ जीवनसत्त्व आढळून येते. सोबतच कॉपर, सल्फर आणि क्लोरीनसारखे घटकही यामध्ये मुबलक प्रमाणात असतात. आरोग्यासाठी अंजीर खूप फायद्याचे आहे

 • fig eating health benefits in Marathi

  अंजिरामध्ये भरपूर अ जीवनसत्त्व आढळून येते. सोबतच कॉपर, सल्फर आणि क्लोरीनसारखे घटकही यामध्ये मुबलक प्रमाणात असतात. आरोग्यासाठी अंजीर खूप फायद्याचे आहे. जाणून घेऊया याचे सेवन करण्याचे फायदे.


  हृदय राहील निरोगी : यामधील ओमेगा ६ फॅटी अॅसिड हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते. अंजिरामध्ये अँटिऑक्सिडंट गुणदेखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरापासून फ्री रॅडिकल्स दूर राहतात आणि रक्तपेशी निरोगी राहतात. यामुळे हृदयही निरोगी राहते.


  वजन होते कमी : अंजिरामध्ये फायबर जास्त आणि कॅलरी कमी असतात. संशोधनानुसार साधारणत: अँंजिराच्या एका तुकड्यामध्ये ४७ कॅलरी असतात व फॅट ०.२ ग्रॅम असते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी अंजीर एक उत्तम स्नॅक्स ठरू शकते.


  पचनक्रिया चांगली राहते : अंजिराच्या तीन तुकड्यांमध्ये जवळपास ५ ग्रॅम फायबर असते. आपल्या शरीराला दिवसभरासाठी लागणाऱ्या २० टक्के फायबरची पूर्तता अंजीर खाल्ल्याने होते. याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाशी संबंधित आजार होत नाहीत.


  रक्तदाब राहील नियंत्रणात : उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या शरीरात सोडियमचा स्तर जास्त झाल्यास शरीरातील पोटॅशियम आणि सोडियमचे संतुलन बिघडायला लागते. अंजीर हे संतुलन कायम राखते. एका सुक्या अंजिरामध्ये १२९ मिलिग्रॅम पोटॅशियम आणि २ मिलिग्रॅम सोडियम असते.


  हाडे बळकट होतात : साधारणत: एका अंजिरामध्ये ३ टक्क्यांपर्यंत कॅल्शियम असते. याचे नियमितपणे सेवन केल्याने शरीरामधील कॅल्शियमची गरज भागते. त्यामुळे हाडेदेखील बळकट होतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

Trending