Home | Flashback | Fight Between Bollywood Actors Due To Girlfriends

किशोर-मिथुन, विवेक-सलमान गर्लफ्रेंडमुळे या अभिनेत्यांमध्ये झाले भांडण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 12:00 AM IST

4 ऑगस्टला मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील गांगुली कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला होता.

 • Fight Between Bollywood Actors Due To Girlfriends

  एन्टटेन्मेंट डेस्क: 4 ऑगस्टला मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील गांगुली कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला होता. त्याचे नाव होते आभास कुमार गांगुली. मात्र प्रेमाने त्याला गंगोपाध्याय म्हणून हाक मारली जात होती. मात्र हा मुलगा जेव्हा मोठा झाला, तेव्हा त्याचे नाव आभास कुमारहून किशोर कुमार असे झाले.


  आम्ही बोलतोय ते भारतीय सिनेसृष्टीत सदाबहार अभिनेते किशोर कुमार यांच्याबद्दल. आपल्या गायन आणि अभिनय कौशल्याच्या बळावर किशोर कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पार्श्वगायक आणि अभिनेत्याबरोबरच किशोर कुमार दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रिप्ट रायटरसुद्धा होते.
  आज (4 ऑगस्ट) किशोर दांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या वयक्ति आयुष्याविषयी काही गोष्टी सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते असे आहेत, ज्यांच्यामध्ये गर्लफ्रेंडमुळे भांडण होतात. किशोर कुमार आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यामध्येही असेच भांडण झाले होते.


  किशोर कुमार आणि मिखुन चक्रवर्ती-
  हिंदी सिनेमांचे सर्वात टॅलेंटेड गायकांमधील एक किशोर कुमार आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यात सुध्दा अभिनेत्री योगिता बालीसाठी वाद झाला होता. योगिता किशोर कुमार यांची पत्नी होती. परंतु 1982मध्ये त्यांनी किशोर यांना सोडून मिथुन चक्रवर्तीसोबत केले होते. त्यामुळे नाराज झालेल्या किशोर यांनी मिथुनसाठी गाणी गाण्यास सोडून दिले होते.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच काही अभिनेत्यांविषयी...

 • Fight Between Bollywood Actors Due To Girlfriends

  2002मध्ये सलमान खानसोबत ब्रेकअप

  आणि मानसिक-शारीरिक त्रासानंतर ऐश्वर्या राय वाईट काळात जगत होती. त्यावेळी विवेक ओबेरॉयने तिला मित्र आणि प्रेमी म्हणून आधार दिला होता. सोबतच, त्याने मीडियासमोर खुलेआम सलमानसोबत पंगा घेतला होता.
  त्यानंतर विवेकला अॅश मिळाली नाही, मात्र सलमानसोबत घेतलेला पंगा त्याला महागात पडला. सलमानने विवेकला धमकी देऊन घाबरवले. सोबतच, त्याला इंडस्ट्रीमध्ये काम न मिळण्यामागेसुध्दा सलमानचाच हात आहे, असे आजही बोलले जाते. मात्र सलमान या आरोपांना फेटाळतो.
  या भांडणानंतर काही वर्षांनी विवेकने एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान स्वत: सलमानची कान पकडून माफी मागितली होती.

   

   

 • Fight Between Bollywood Actors Due To Girlfriends

  रणबीर कपूर आणि सलमान खान
   
  जेवढ्या गर्लफ्रेंड तेवढे वाद, असेच काही सूत्र आहे बॉलिवूडच्या दबंग खानचे. विवेक आणि शाहरुखनंतर सलमान माजी गर्लफ्रेंड कतरिनामुळे रणबीरसोबत भांडला होता. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, सलमान म्हणाला होता, की रणबीरने त्याची गर्लफ्रेंड त्याच्यापासून हिसकावून घेतली. त्यावेळी सलमानचा इशारा कतरिना कैफकडे होता.


   

 • Fight Between Bollywood Actors Due To Girlfriends

  शाहरुख खान आणि सलमान खान-
   
  2008मध्ये कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीमध्ये कतरिनामुळे शाहरुख आणि सलमानमध्ये भांडण झाले होते. खानमध्ये झालेल्या या भांडणानंतर दोघे एकमेकांचे शत्रू झाले. मात्र, आतापर्यंत स्पष्ट झालेले नाहीये, की त्या रात्री पार्टीत नेमके काय घडले होते. परंतु बातम्यांनुसार, हा वाद कतरिनामुळेच झाला होता.


   

 • Fight Between Bollywood Actors Due To Girlfriends

  जॉन अब्राहम आणि डिनो मोरिया-
   
  जॉन आणि डिनो यांचे शत्रूत्व किंवा भांडण नाहीये. परंतु दोघे एकमेकांसोबत फ्रेंडली राहत नाहीत. याचे कारण आहे, अभिनेत्री बिपाशा बसु. 1999 ते 2002पर्यंत बिपाशा आणि डिनो रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी अनेक सिनेमे केले. परंतु डिनोसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशा जॉनसोबत जवळीक वाढवायला लागली. जॉन-बिपाशाचे नाते तब्बल 9 वर्षे टिकले आणि त्यानंतर दोघांचे नाते 2011मध्ये संपुष्टात आले.

Trending