Home | International | China | Fight between driver, passenger causes Chongqing bus tragedy

Accident: चालत्या बसमध्ये ड्रायव्हरसोबत महिला प्रवाशाचे कडाक्याचे भांडण, मग पुलावरून थेट नदीत कोसळली बस, 13 ठार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 03, 2018, 12:04 PM IST

भांडणाचे 'हे' कारण ऐकून व्हाल चकित, दुर्घटना CCTV मध्ये झाली कैद

 • Fight between driver, passenger causes Chongqing bus tragedy

  न्यूज डेस्क - चीनमध्ये झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दक्षिण- पश्चिम चीनमध्ये एका चालत्या बसमध्ये महिला प्रवाशाने अचानक बस ड्रायव्हरसोबत भांडण सुरू केले. दोघांच्या या भांडणात चालकाचे वाहनाकडे दुर्लक्ष झाल्याने बस थेट नदीत कोसळली. या अपघातात 13 जण मृत्युमुखी पडले आहेत.

  'हे' होते भांडणाचे कारण

  मीडिया रिपोर्टनुसार, ड्रायव्हरने बस स्टॉपवर बस थांबवली नाही, त्यामुळे दोघांचे भांडण सुरू झाले. महिलेने ड्रायव्हरच्या डोक्यावर प्रहार केला. रविवारी घडलेल्या या घटनेच्या व्हिडियो फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओनुसार, महिलेने ड्रायव्हरच्या डोक्यावर प्रहार केल्याने ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली.

  बसमधील सीसीटीव्हीत कैद झाली घटना
  महिलेने प्रहार केल्यावर ड्रायव्हरला धक्का बसून स्टेअरिंग डाव्या बाजूला फिरली. तेवढ्यात समोरून येणाऱ्या वाहनाला बसने धडक दिली. दक्षिण-पश्चिम चोंगकिंग शहराच्या यांग्त्जी नदीच्या पुलावर रेलिंग तोडून बस नदीत कोसळली. या बसमध्ये एकूण 15 प्रवासी होते. पोलिसांनी 13 मृतदेह बाहेर काढले असून 2 जण बेपत्ता आहेत.

Trending