आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेड येथे राष्ट्रवादी - भाजप गटात हाणामारी; तिघे किरकोळ जखमी, काही काळ तणाव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर - पोल एजंटला विचारण्यास गेलेल्या मतदाराच्या कारणावरून राष्ट्रवादी व भाजप या दोन गटात राडा झाला असून तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील जामखेड येथील वाॅर्ड क्रमांक पाचमधील बूथ क्रमांक २७९ व २८० या परिसरात घडली. या वादामुळे या परिसरात काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काही काळ मतदानात गोंधळ झाला होता. 

बदनापूर विधानसभा मतदार संघातील अंबड तालुक्यातील जामखेड येथे एक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेला. त्याने तेथील पोल एजंट ऐजाज कुरेशी यास विचारपूस केली असता, जामखेडचे भाजप सरपंच अलिमाबी इब्राहिम कुरेशी यांचे पती इब्राहिम कुरेशी व राष्ट्रवादीचे उपसरपंच फैरोजबेगम फैसल कुरेशी यांचे पती फैसल कुरेशी यांच्यात चांगलीच वादावादी झाली. या वादावादीमुळे दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव निर्माण होऊन एकमेकांची कपडे फाडाफाडी सुद्धा झाली. या राड्यात भाजपचे जाकेर कुरेशी व राष्ट्रवादीचे फैसल कुरेशी, एजाज पठाण यांना किरकोळ मार लागला आहे. सदर घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, उपनिरीक्षक सुखदेव साठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी मात्र पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. बदनापूर विधानसभा मतदार संघात घडलेल्या या घटनेमुळे मतदानाला गालबोट लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...