आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fight Between Pakistan And Afghanistan Fans In Leeds During Pakistan Vs Afghanistan Match

WorldCup/ पाकिस्तानी समर्थकांची अफगानी समर्थकांना मारहाण, 'जस्टिस फॉर बलूचिस्तान' लिहीलेले स्लोगन घेऊन विमान उडाल्याने फॅन्स झाले नाराज...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- लीड्समध्ये आज(शनिवार) सुरू असलेल्या पाकिस्तान-अफगानिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये राडा झाला. स्टेडियमवरून "जस्टिस फॉर बलूचिस्तान" असे लिहीलेले बॅनर घेऊन विमान गेल्याने, नाराज झालेल्या पाकिस्तानी समर्थकांनी अफगानी समर्थकांना मारहाण केली.

 

तर, आयसीसीने सांगितले की, हे अनधिकृत विमान होते. यावर 'बलूचिस्तानसाठी न्याय' असे स्लोगन होते. लीड्सचा एअर ट्रॅफिक विभाग याप्रकरणाची चौकशी करत आहे.


रविवारी लॉर्ड्सच्या बाहेर लागले होते पोस्टर
बलूचिस्तानच्या समर्थनाची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी रविवारी लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या बाहेर बलूचिस्तान समर्थकांनी पोस्टर लावून पाकिस्तानचा विरोध केला होता. सामन्यानंतर पाकिस्तानी समर्थकांनी हे पोस्टर फाडले होते.