आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सहकारमहर्षी'च्या सभेत धक्काबुक्की; फत्तेसिंह माने यांच्या कुटुंबातील काही सदस्य व सभासदांत शाब्दिक चकमक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- येथील सहकारमहर्षी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने यांच्या कुटुंबातील काही सदस्य व सभासदांत शाब्दिक चकमक झाली. विषय वाचन करणारे सभासद मारुती घोडके यांना धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर सर्व विषय मंजूर करण्यासाठी सभासदांनी घोषणा देत जोर लावला. गोंधळाच्या वातावरणात सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. 


शुक्रवारी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळाच्या वातावरणात झाली. सभा सुरू होताच फत्तेसिंह माने यांनी सर्व विषयांवर चर्चा करण्याची मागणी केली. विषय वाचनानंतर यावर अध्यक्ष निर्णय घेतील, असे कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते यांनी सांगितले. त्यानंतर सभा सुरू झाली. विषयांचे वाचन सुरू असताना विषयपत्रिका हिसकवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत सर्व विषय मंजूर करण्याच्या जोरदार घोषणा सभासद देऊ लागले. गोंधळातच सर्व ११ विषय मंजूर करण्यात आले. फत्तेसिंह माने, पांडुरंग देशमुख हे हातात माइक घेऊन बोलण्याचा प्रयत्न करत होते. 

 

वकिलांशी चर्चेनंतर कारवाई 
आज झालेल्या गोंधळासंदर्भात वकिलांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करणार आहे.
- जयसिंह मोहिते, अध्यक्ष, सहकारमहर्षी कारखाना 

बातम्या आणखी आहेत...