Home | National | Other State | Fighting between a man and a policeman during traffic checking

कारमधील व्यक्तीने पोलिसांना विचारले - कशाबाबत पावती फाडत आहात, पोलिसाचा चढला पारा; मग झाला मोठा गदारोळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 12:25 PM IST

ट्रॅफिक चेकिंग दरम्यान एका व्यक्तीला मारहाण आणि त्यानंतर त्याच्याविरोधात FIR दाखल करण्याचा व्हिडिओ व्हायरल

  • Fighting between a man and a policeman during traffic checking

    चंडीगड - हा व्हिडिओ चंडीगड येथे ट्रॅफिक चेकिंग दरम्यानचा आहे. हा व्हिडिओ पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्न उपस्थित करतो. सदरील व्यक्ती पत्नी आणि मेहुण्यासोबत कारने प्रवास करत होता. तेवढ्यात पोलिसांनी त्याला अडवले. व्यक्तीने दंड आकारण्याचे कारण विचारले असता वादास सुरुवात झाली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी व्यक्तीवर FIR दाखल केला आहे. पण या व्हिडिओने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहे.


    सदरील व्यक्ती सेक्टर-34 मध्ये कोचिंग इन्स्टीट्यूट चालवतो. मिळालेल्या माहितीनुसार व्यक्ती आपल्या क्लासेसहून कारमध्ये बसून जाणार होता. तेवढ्यात त्याची नजर दंड आकारणाऱ्या SI वर गेली. दंड आकारण्याचे कारण विचारले असता तेथे वाद सुरू झाला. व्यक्तीने आपली वर्दी फाडली असल्याचा SI ने आरोप केला आहे.

Trending