आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fighting Between TC, Lady Police And Without Ticket Girl At Sonipat Railway Station

शॉकिंग व्हिडिओ: विनातिकीट पकडलेल्या तरुणी पोलिसांनी बेदम मारून वसूल केला दंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनिपत, हरियाणा - हा लज्जास्पद व्हिडिओ हरियाणाच्या सोनिपत रेल्वे स्टेशनचा आहे. आरपीएफच्या महिला पोलिसांनी आणि तिकीट निरीक्षकाने विनातिकीट पकडण्यात आलेल्या एका तरुणीला फरपटत नेले. तेथे तिला बेदम मारहाण करून दंड वसूल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस डिपार्टमेंटने आपला बचाव करायला सुरुवात केली आहे. तथापि, या व्हायरल व्हिडिओत मुलीला पोलिस लाथा-बुक्क्याही मारताना दिसत आहेत. हा प्रकार सुरू असताना तेथे उपस्थित एका प्रवाशाने मोबाइलमध्ये व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

 

- विनातिकीट पकडल्यानंतर मुलीला प्लॅटफॉर्मवर उतरवण्यात आले. यादरम्यान महिला तिकीट निरीक्षकाने आरपीएफ पोलिसांतील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला बोलावले. काही वेळ तिघींमध्ये वाद झाला. यानंतर तरुणीला फरपटतच ठाण्यात नेण्यात आले. तेथे तिच्याकडून दंड वसूल करून तिला सोडण्यात आले. दुसरीकडे, आरपीएफ ठाण्याचे प्रभारी पी. एन. गोस्वामींनी मात्र मुलीसोबत मारहाण झाल्याचे नाकारले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...