किरकोळ कारणावरून मारहाणीच्या / किरकोळ कारणावरून मारहाणीच्या तीन घटना

शेतातील गवत घेण्याच्या कारणावरून केली मारहाण

प्रतिनिधी

Jan 01,2019 11:46:00 AM IST

नाशिक - नाइट रनला वाहतूक थांबवल्याच्या रागातून कारमधील दांमपत्यासह त्यांच्याच नातेवाईकांनी रस्त्यावर सहायक पोलिस आयुक्तांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. कारमधील महिलेने सहायक अायुक्तांवर हात उचलत सरकारी कामात अडथळा आणला. रविवारी (दि. ३०) रात्री गंगापूररोडकडून कॅनडा कॉर्नरकडे येताना हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात चोविस तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. संशयित महिलेसह चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली अाहे.


पोलिसांनी दिलेली माहिती आणि वाहतूक शाखेचे सहायक उपनिरीक्षक जहिरोद्दीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री ९ वाजता तंबाखुमुक्तीच्या जनजागृतीसाठी नाइट रननिमित्त वाहतूक नियोजन करत असताना रनचे स्पर्धक कॉलेजराेड, कॅनडा कॉर्नर सिग्नलकडे जाणार असल्याने जुना गंगापूर नाका येथे वाहतूक थांबवण्यात अाली. यावेळेस कार (क्रमांक एमएच ०२ सी.डी. ००४१) मधील चालकाने जोरात विनाकारण हॉर्न वाजवला. सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी 'जरा थांबा.. रनचे स्पर्धक पास होत आहेत'. असे सांगितले. यावर 'तुम्ही वाहतूक का आडवली.. आम्हाला सिडकोला जायचे अाहे. रात्री बेरात्री विनाकारण लोकांना त्रास देता' असे बोलत संशयित महिला प्रांजल पंकज कोठावदे यांनी सहायक आयुक्त यांना मारहाण केली. नखाते यांनी 'मी एसीपी आहे, तुम्ही कायदा हातात घेऊ नका' असे सांगत असतानाही त्यांनी अंगावर धावून जात पुन्हा धक्काबुक्की केली. कारचालक विशाल सुभाष वाणी (रा. दुर्गामाता मंदिरजवळ, पाटीलनगर, सिडको), पंकज प्रभाकर कोठावदे (रा. बळीराम पेठ, शनिपेठ, जळगाव) यांनी धक्काबुक्की केली. तसेच हा प्रकार बघणारा संशयित राजू लक्ष्मण लांडे यानेही पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली.


जामीन मिळणे कठीण..
संशियितांच्या विरोधात चोविस तासांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सोमवारी (दि. ३१) न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संशयितांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. शासकीय कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हा आता गंभीर गुन्हा असून यामध्ये जामीन मिळणे कठीन आहे.


सोलापूर- शेतातील गवत घेण्यास विरोध केल्यामुळे शोभा हरिदास ऊर्फ सिद्राम तोडकरी (वय ५०, रा. बाळे) आणि हरिदास ऊर्फ सिद्राम तोडकरी या दोघांना मारहाण करण्यात आली, अशी फिर्याद शोभा तोडकरी यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दिली.


तोडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मल्लू सदाशिव तोडकरी, नीलावती मल्लू तोडकरी, किरण मल्लू तोडकरी, अनिल मल्लू तोडकरी (रा. सर्व बाळे) यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.


अज्ञात कारणावरून मारहाण
नई जिंदगी, लोकमान्य नगर येथील राहत्या घरात अज्ञात कारणांवरून नसरीन रिजवान फणीबंद (वय ३२) हिला मारहाण करण्यात आली. तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटने बाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


दगडाने केली मारहाण
पांजरापोळ चौक, पूनम लॉजजवळ किरण याने अज्ञात कारणावरून रेखा विनोद ढावरे (वय २९, रा. भवानी पेठ मड्डी वस्ती) यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये ती जखमी झाली आणि तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली.

X
COMMENT