Home | Maharashtra | Vidarva | Akola | fihgting in meeting

अामसभेच्या कामकाजावरुन गदारोळ; शिक्षकांत हाणामारी

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 11:23 AM IST

अनेक प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या रविवारी झालेल्या अामसभेनंतर शिक्षकां

 • fihgting in meeting

  अकाेला- अनेक प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या रविवारी झालेल्या अामसभेनंतर शिक्षकांमध्ये वाद, धक्काबुक्की व हाणामारी झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले. अामसभेत अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. सभा संपल्यानंतर शिक्षकांमध्ये झालेल्या वादाला याच प्रकरणाची पृष्ठभूमी हाेती, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे अाहे. काही वेळेनंतर सिटी काेतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आणि शिक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला. मात्र प्रत्यक्ष सभेत हाणमारीसारखा प्रकार घडला नसून, बाहेर काय झाले, याची माहिती नसल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष विजय टाेहरे यांनी स्पष्ट केले.


  रविवारी २ सप्टेंबरला पतसंस्थेची वार्षिक अामसभा प्रमिलाताई अाेक सभागृहात पार पडली. सकाळच्या सत्रात सत्कार साेहळा अायाेजित करण्यात अाला. त्यानंतर दुपारी सभेला सुरुवात झाली. सभेच्या शेवटी सभासदांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. शिक्षकांनी अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर सभा संपवण्यात अाल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. सभा संपून बाहेर पडत असलेल्या काही शिक्षकांमध्ये प्रथम वाद झाला. त्यातून धक्काबुक्की, हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे अाहे.


  गुरुजी तुम्हीसुद्धा.....पाइप काेठून अाणला ?
  प्रत्यक्षदर्शींच्या मते हाणामारीत दुचाकीच्या एका पार्टला असलेल्या पाइपचा उपयोग करण्यात आला. मात्र सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.शिक्षकाने हा पाइप कुठून अाणला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत अाहे. याबाबत सखाेल पोलिस चाैकशी झाल्यास सत्य उजेडात येईल. देशाची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर अाहे. मात्र शिक्षकांच्या पतसंस्थेच्या कार्यक्रमात हाणामारी हाेत असल्यास विद्यार्थी काेणाचा अादर्श डाेळ्यासमाेर ठेवतील, असा सवाल उपस्थित हाेत अाहे. अनेक शिक्षक राजकारण करण्यात गुंग असल्याचे आणि स्वत:च्या हितासाठी संघटना चालवित असल्याचा अाराेप हाेताे. एकाने तर स्वत:च्या बदलीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 'विजयी' प्रयत्न केल्याचीही चर्चा हाेती. अर्थात काही शिक्षक हे प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत असल्याने अाजही या शाळा सुरु अाहेत आणि गरजंूंसाठी अाधारस्तंभच अाहेत, असाही दावा काही जाणकार करीत अाहेत.

  कार्यक्रमाला गालबोट; पोलिस घटनास्थळी,काेण काय म्हणाले?
  प्रत्यक्ष कार्यक्रम शांततेने पार पडला. सभेत पूर्वनियाेजनानुसार विचारण्यात अालेले प्रश्न व वेळेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे देण्यात अाली. सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात अाली. सभेनंतर प्रकार घडला असल्यास त्याचा अनधिकृत बांधकामाचा कोणत्याही संबंध नाही.'' विजय टाेहरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्था.


  पतसंस्थेचे काही बांधकाम अनधिकृत असून, हार्डशिप कंपाऊंडींगबाबत १५ लाख दंड भरावा लागणार अाहे. हे पैसे नफ्यातून भरण्यास माझा िवराेध हाेता. मात्र मला काहींनी िवराेध केला. त्यानूतनच मारहाण केली. बांधकामाबाबत संबंधितांवर कारवाई हाेऊन त्यांच्याकडून वसुली हाेणे अावश्यक अाहे.'' शंकर तायडे, शिक्षक.


  काय अाहे प्रकरण : शिक्षक पतसंस्थेची स्वतःच्या मालकीची इमारतही असून, वरचा मजला सन २००२पूर्वी बांधण्यात अाला हाेता. मात्र मनपाकडून पतसंस्थेला अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत मार्च महिन्यात नोटीस बजावण्यात अाली हाेती. या नाेटीसमध्ये एकूण प्रती दिन २० हजार रुपये खर्च भरावा, असे नमूद अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी खर्च भरण्यात यावा; अन्यथा खर्च मालमत्ता करातून वसूल करण्यात येईल, असेही नाेटीसमध्ये स्पष्ट करण्यात अाले हाेते.


  अाेक हाॅल येथे अायाेजित कार्यक्रमात वाद झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दाेन्ही गटातील शिक्षकांशी चर्चा केली. चर्चेअंती वाद मिटला.

  - विलास पाटील, ठाणेदार, शहर काेतवाली.

Trending