Home | Maharashtra | Vidarva | Akola | filed complaint against Rashi, Bayer, Ankur seed company

राशी, बायर, अंकुर बियाणे कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 12:09 PM IST

कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्याप्रकरणी राशी, बायर व अंकुर या बियाणे कंपनीविरुद्ध सोमवारी (दि. २७) रात्र

  • filed complaint against Rashi, Bayer, Ankur seed company

    अमरावती- कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झाल्याप्रकरणी राशी, बायर व अंकुर या बियाणे कंपनीविरुद्ध सोमवारी (दि. २७) रात्री बेनोडा पोलिस ठाण्यात शेतकऱ्याच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक व तपास अधिकारी संगीता हेलोंडे यांनी दिली.


    वाडेगाव (ता. वरूड) येथील संजय महादेव साबळे यांनी वघळ शिवारात शेत सर्व्हे क्रमांक १०६, १०७ आहे. त्यांनी वाडेगाव येथील गौरी कृषी सेवा केंद्रातून बायर कंपनीच्या एकूण ५ बॅग खरेदी केल्या होत्या. त्यानंतर संजय साबळे यांनी राजुरा बाजार येथील शेतीधन कृषी केंद्रातून राशी व अंकुर सीड्स कंपनीचे कपाशी बियाणे खरेदी करून त्याची १२ जून रोजी शेतात पेरणी केली होती. दरम्यान सध्या कपाशी पाते व फुलावर असून त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबतची तक्रार संजय साबळे यांनी कृषी विभागाकडेही केली होती. त्यानुसार कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर व पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी साबळे यांच्या शेतातील दहा कपाशीच्या झाडांचा पंचनामा केला असता त्यात दहाही झाडांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले.


    याबाबतचा अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सादर केला. याबाबतची तक्रार संजय साबळे यांनी बेनोडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून सोमवारी रात्री उशीरा राशी सीड्स, बायर व अंकुर सीड्स कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कंपन्यांचे वाण बीजी-२ तंत्रज्ञानाचे असूनही त्यावर बोंडअळी येऊन सुमारे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे साबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान सदर कंपनीने बोगस बियाणे देऊन फसवणूक केल्याने नुकसान भरपाई मिळून संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी साबळे यांनी तक्रारीतून केली आहे.

Trending