आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्समधील उबे बेटावर दररोज 4 तास येते भरती, वर्षातील 130 दिवस लोकांच्या घरात शिरते पाणी, तरीही लोक घरे सोडेनात 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीला - फिलिपाइन्सचे उबे बेट. येथे दररोज सुमारे ४ तास भरती येते. यामुळे घरात गुडघाभर पाणी साचते. या बेटावर वर्षातील १३० दिवस अशीच परिस्थिती असते. तरीही लोक येथून जाण्यास तयार नाहीत. बेटावर २०० लोकवस्ती आहे. येथे खूप शांतता आहे. 
येथे राहिल्याने तणाव वाटत नाही. याबद्दल मारिया सावेद्रा म्हणाल्या, पाणी घरात शिरलेले असले तरी आरामात राहतो. बेटावर ताजे मासे मिळतात. ते विकून आम्ही गरजेच्या वस्तू आणतो. येथे आरामदायी जीवन व्यतीत करतो आहोत. यासारखे उत्तम ठिकाण दुसरे कोणते नाही. २०१३ मध्ये आलेल्या ७.१ तीव्रतेच्या भूकंपात उबे बेटावरील जमीन एक मीटर खोल खचली होती. इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चंेजच्या आकलनानुसार, २१०० पर्यंत समुद्रतळ २६ ते ९८ संेमीपर्यंत वाढेल. फिलिपाइन्स ४८ कमजोर जलवायू फोरमचा एक भाग आहे. फोरमनुसार फिलिपाइन्सची अनेक बेटे नष्ट होण्याचा धोका आहे. 

 

स्टुलावर उभे राहून अभ्यास करतात 
लोकांनी भरतीच्या पाण्यापासून सामान वाचवण्याचे उपाय शाेधले आहेत. पाळीव जनावरांना बांबूच्या मचाणावर ठेवतात. शाळांत बॅग ठेवण्यासाठी कपाटे तयार केली आहेत. मुले स्टुलावर उभे राहून अभ्यास करतात. फर्निचर भिजू नये म्हणून पाय मोठे करण्यात आले आहेत. 


रहिवासी पुरातही राहतात आनंदी 
निवासी वस्त्यांत पाणी शिरल्यानंतर काही समस्या निर्माण होतातच. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे भाज्या नष्ट होतात. संशोधक जामेरो म्हणाले, येथील घरे सोडून जाण्यास लोक तयार नाहीत. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत ते दैनंदिन आयुष्य घालवतात. येथे आलेल्या पुराचा आनंदही घेतात. 


 

बातम्या आणखी आहेत...