Home | National | Other State | Filling the potholes and chambers on the street in Karnataka is shown by 3D painting

कर्नाटकात रस्त्यावरील खड्डे आणि चेंबर्स भरण्यासाठी थ्रीडी पेंटिंगने दर्शवला विरोध

वृत्तसंस्था | Update - Dec 08, 2018, 10:50 AM IST

पेंटिंगचे फोटो प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांकडून काम सुरू

  • Filling the potholes and chambers on the street in Karnataka is shown by 3D painting

    म्हैसूर- कर्नाटकातील म्हैसूर येथे रस्त्यावरील खड्डे व उघडे चेम्बर्स बंद करण्याच्या मागणीसाठी हलागुरू शिवरंजन नावाच्या कलावंताने थ्रीडी पेंटिंग तयार करून सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. त्याचा हा अनोखा विरोध लोकांना आवडला. त्याच्या पेंटिंगची छायाचित्रे लोकांनी सोशल मीडियावरही व्हायरल केली आहेत. ही छायाचित्रे पाहून सरकारी यंत्रणेला अखेर जाग आली. त्यांनी या भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

    शिवरंजन यांनी सांगितले, म्हैसुरच्या चर्म राजेंद्र अकादमी ऑफ व्हिज्युअल आर्टमध्ये शिक्षण घेत आहेत. तीन वर्षापूर्वी अशाच एका उघड्या चेंबरमध्ये पडून त्यांना अपघात झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदारपणाविरोधात आघाडी उघडली. लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी एक मोहिम सुरु केली. आजवर त्यांनी ३० पेक्षा जास्त खड्ड्याचे थ्रीडी पेंटिंग तयार केले होते.

Trending